कोकण – किरण बाथम
दमखाडी येथील अनेक वर्षांपासून चालत आलेली श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिहंडी परंपरा अबाधित ठेवून या वर्षी देखील हा सोहळा संपन्न झाला. दमखाडी संत गोरोबा गोविंदा पथकाचे जूणे जाणते जेष्ठ मार्गदर्शक श्री यदुराम पडवळ यांच्या निवासस्थानी गोविंदा पथक येऊन त्यांचे आशिर्वाद घेतला असता त्यांनी या पथकाचे स्वागत केले आणि ही परंपरा गेली ८० वर्षांपासून आजपर्यंत एक लंगोट आणि टीशर्ट हा पेहरावात आपल्या गोविंदा पथकाची ओळख आजही कायम आहे.
असे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर यांच्या तोंडून एकवले.तर संत गोरोबा मंडळाच्या वतीने राकेश पवार येथे दहिहंडी साठी उत्तेजीत बक्षीसे लावून गोविंदा पथकांना आनंद देत असतात.या अशा प्रकारच्या बक्षिसे इथ येऊन सलामी देणारे सर्वच गोविंदा पथकाला दिले जाते.
या वेळी दमखाडी गोविंदा पथकाने एका प्रयत्नात ही दहीहांडी फोडून विक्रम केल्याचे महेश कोल्हटकर यांनी सांगितले तर रोहा तालुक्यातील जवळपास चारशे गोविंदांना गेली सात ते आठ वर्षे नाष्टा पाणी व्यवस्था दमखाडी येथील तरुण उद्योजक राकेश पवार हे करत असल्या बदल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करुन आभार मानले. हा पथक संपूर्ण रोहा नगरीच्या दहिहंडीला सलामी देण्यासाठी जाते व ते पुर्ण करुनच सायंकाळी ७:००च्या सुमारास गोविंदा विसर्जन केला जातो.