रामटेक – राजू कापसे
दमयंती ताई देशमुख बी.एड. कॉलेज, रामटेक येथे संस्थाअध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्य जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एड द्वितीय वर्ष निरोप समारंभ संपन्न झाला. बी. एड. शिक्षणाचे शेवटचे वर्ष संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बी.एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर निरोपाचा हा सोहळा साजरा करण्यात आला. निरोपाच्या निमित्ताने बी. एड. अभ्यासक्रमातील वरिष्ठ व कनिष्ठ आजी-माजी विद्यार्थ्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे या उद्देशाने हा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
द्वितीय वर्षातील छात्राध्यापक कु. निकिता अंबादे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य आणि इथे आलेले अनुभव सर्वांसमोर शेअर केले. तसेच कु. शितल तागड यांनी आपण या कॉलेजमध्ये कशाप्रकारे घडलो ,शिक्षकांचे साह्य लाभले, त्यांचें मार्गदर्शन याचे ऋण व्यक्त केले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील छात्राध्यापकांना शुभेच्छा देत त्यांच्याविषयी असणारी आपुलकी आदर मनोगतातून व्यक्त केला. त्यानंतर विविध विनोदी खेळ घेऊन निरोप समारंभातील उदासीनतेचे रूपांतर आनंदात करण्यात आले.
दिवसभर विविध स्पर्धांनी हा निरोप समारंभ सजलेला होता. या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कु. अलिषा ढोबळे यांनी केले. बी.एड. प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या द्वितीय वर्षातील भावी शिक्षकांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. उर्मिला नाईक, प्रा.किरण शेंदरे, प्रा. नितिषा घोडेस्वार, कु.गीता समर्थ, अतुल बुरडकर, सुरेश कारेमोरे तसेच अतिथीस्थानी प्रा.चेतना ऊके, प्रा.शालू वानखेडे, प्रा.कला मेश्राम, प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, प्रा. अनिल मिरासे, प्रा.मयुरी टेंभुर्णे,प्रा.देवानंद नागदेवे, प्रा. डॉली कळमकर,प्रा.अमित हटवार,प्रा.विलास मडावी,प्रा.आकाश मोहबिया, राजेंद्र मोहनकर, सुनिल पोटभरे, सूरेश कळंबे, निकिता फाये, स्नेहा गाथे, संदीप ठाकरे, राष्ट्रपाल मेश्राम, शामलाल मेश्राम, सुनिता कैकाडे, वर्षा माहुरकर हे उपस्थित होते.