रामटेक – राजू कापसे
दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारला दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज, रामटेक येथे संस्थाध्यक्ष मा.रविकांत रागीट सर व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समान संधी केंद्र स्थापन करून उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्या प्रसंगी उदघाटन करण्याकरिता रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी रिबीन कापून केंद्राचे उदघाटन केले तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एड व डी.एड कॉलेज च्या प्राचार्या जयश्रीताई देशमुख उपस्थित होत्या.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून बार्टी चे समतादुत राजेश राठोड यांची उपस्थिती होती तसेच राजेश राठोड यांनी समान संधी केंद्राचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड ची विद्यार्थिनी निकिता अंबादे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार प्रा. देवानंद नागदेवे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बी.एड व डी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक, समान संधी केंद्राच्या नोडल अधिकारी प्रा.किरण शेंद्रे, प्रा.शालू वानखेडे, प्रा.अनिल मिरासे, प्रा.अतुल बुरडकर,प्रा.देवानंद नागदेवे,प्रा.मयुरी टेंभुर्णे, प्रा. विलास मडावी,प्रा. कला मेश्राम तसेच विद्यार्थी उपस्थीत होते.