अवैध गुटखा वाहतुक करणा-यावर आठवड्याभरात दुसरी मोठी कार्यवाही…
दहीहंडा – दहीहंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याविरोधात ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी कारवाईचा सपाटा लावला असून आज गांधिग्राम नजीकच्या सैराट ढाब्यासमोर दबा धरून बसलेल्या दहीहंडा पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले. दिनेश लेखराज बजाज असे या इसमाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एकूण ६९ हजार ५४ रूपयाचा मुददेमाल जप्त केला.
दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांना दिनांक १८ मे २०२४ रोजी रोजी गोपनीय माहीती मिळाली की एक इसम दुचाकी वाहनाने शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा सुगंधीत तंबाखु पानमसाला घेवुन अकोला येथून गांधीग्राम कडे येणार आहे.
मिळालेल्या गोपनिय माहीती वरून सदरची माहिती वरीष्ठांना देवुन पोलीस स्टॉफचे मदतीने दोन पंचासह गांधीग्राम येथील सैराटढाब्या समोरील रोडवर नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहीतीप्रमाणे नमुद वाहन स्टार सिटी क्र. MH 30 AH 5401 या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनावर असलेल्या बॅग मध्ये आरोपी दिनेश लेखराज बजाज रा शिंदी कॅम्प अकोला ता जि अकोला हा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पानमसाला २९ हजार ५४ रूपयाचा स्वताचे फायद्या करीता विक्री करण्यासाठी वाहतुक करतांना मिळून आल्याने व वाहतुक करण्याकरीता वापरलेली गाडी ३० हजार रुपये व एक माबाईल १० हजार रुपये असे एकुण ६९ हजार ५४ रूपयाचा मुददेमाल मिळून आल्याने सदरचा माल पंचा समक्ष जप्त करून दहिहांडा येथे कलम३२८, १८८, २७२, २७३ भादवि सहकलम २६ (२) (iv), २७ (३) (d),२७ (३) (९), ३० (२) (व), अन्न सुरक्षा मानके अधिनीयम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
वरील नमुद कार्यवाही पोलीस अधिक्षक मा बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक मा अभय डोंगरे सा, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनमोल मीत्तल सा याचे मार्गदर्शनाखाली सपोनि पुरुषोत्तम ठाकरे ठाणेदार पो स्टे दहीहांडा, पोहेकॉ, पो हे कॉ अनिल भांडे, पो हे कॉ विजयसिंग चव्हाण नापोकॉ प्रवीण पेटे, पो कॉ रामेश्वर भगत, पो कॉ विजय तायडे पो कॉ आशिष नांदोकार यांनी केली