नरखेड–19
नरखेड, पेठ विभाग संत जगनाडे चौक येथे सार्वजनीक डहाका आरती मंडळ तर्फे भव्य महादेवाच्या गाण्याचे डहाका संमेलनाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. या बक्षिस वितरण समारंभासाठी प्रचंड संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री उकेशभाऊ चव्हाण, माजी नगराध्यक्ष श्री संजयभाऊ चरडे, माजी उपाध्यक्ष श्री अजयभाऊ बालपांडे, तेली पंच कमिटीचे अध्यक्ष श्री वसंतराव कोरडे, माजी नगरसेवक श्री प्रशांतभाऊ खुरसंगे, श्री राजेश क्षिरसागर, श्री शरदभाऊ मदनकर, श्री लीलाधरभाऊ रेवतकर, श्री पंढरीजी रेवतकर, श्री सुरेशजी खंते, श्री जगनजी घुसे, श्री रामाजी ठाकरे, श्री भासुजी मदनकर, श्री गणपतीजी बालपांडे, श्री प्रकाशजी कोरडे, श्री अरुणभाऊ टेकाडे, श्री रामेश्वरभाऊ चरडे आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विजेत्या मंडळांना बक्षीस वितरण करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यंदा तालुका पातळीवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. २१ पेक्षाही अधिक मंडळे या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या डहाकाचे सुरेल स्वर संत जगनाडे चौक परिसरात सकाळपासूनच निनादत होते. नागरिकांच्या उस्फुर्त उत्साहाने सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रास्ताविक व संचालन श्री रमेशभाऊ रेवतकर यांनी तर आभार मंडळाचे सचिव श्री देविदासजी रेवतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री चंदूभाऊ खुरसंगे, उपाध्यक्ष श्री गणपतीजी रेवतकर, कोषाध्यक्ष श्री सुरेंद्रजी बालपांडे, सहसचिव श्री विशालजी बांडे, सदस्यगण श्री शिवरामजी कामडी, श्री शंकररावजी बालपांडे, श्री रामदासजी मेटांगळे, श्री संजयजी रेवतकर, श्री सुरज मदनकर, व अनेकांनी परिश्रम घेतले.