अकोला – संतोषकुमार गवई
अवैध सावकारी करित असल्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार अकोला जिल्हयातील भांबेरी ता. तेल्हारा जि. अकोला येथे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अंतर्गत धाडीचे डॉ. प्रविण एच. लोखंडे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांचे मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले आहे.
अकोला या ठिकाणी एक पथकाव्दारे शोध मोहिम आयोजित करण्यात आली. सहकार विभागाचे अधिकारी पथक प्रमुख श्री. एम. एस. मनसुटे, सहकार अधिकारी श्रेणी-1 अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका अकोट यांचा समावेश होता. यांच्या पथकाव्दारे एकूण 05 कर्मचा-याकडून आज धाड टाकण्यात आली.
या धाडी दरम्यान आक्षेपार्ह खरेदीखत 09, धनादेश 02, बँक पासबुक 17, कोरे स्टॅम्प 01, चेकबुक 02, इसारचिठ्ठी 02 व इतर कागदपत्रे 05 इत्यादी जप्त करण्यात आले. यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त पोलीस विभाग अकोला यांचेकडून घेण्यात आला. धाडीमधील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सदर प्रकरणी पथक सहायक म्हणून श्री. एम. जी. विखे, सहकार अधिकारी श्रेणी-2, श्री. आर. एम. बोद्रे, लेखापाल, श्री. जी. एम. कवळे, सहाय्यक सहकार अधिकारी, श्रीमती रेखाबाई पंजाबराव गव्हाळे, लिपिक स्वं. इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था, तेल्हारा व श्री. निलेश विष्णुपंत फाळके, व्यवस्थापक, सातपुडा अर्बन को- ऑप क्रेडीट लि. तेल्हारा इत्यादी अधिकारी कर्मचारी धाड कार्यवाहीमध्ये सहभागी होते. सदर कार्यवाहीमध्ये पंशु वैद्यकिय अधिकारी कार्यालय, तेल्हारा व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी पंच म्हणून तसेच पोलिस विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग होता.
अकोला जिल्हयात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह आपल्या तालुक्याच्या उपनिबंधक सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावा. तसेच ज्या नागरीकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृ पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे असे आवाहन डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी केले.
आजपर्यंत या कार्यालयामार्फत अवैध सावकारी अंतर्गत बळकाविलेल्या एकुण 150.33 हे. आर शेतजमीन व 4939.50 चौ. फुट जागा तसेच एक राहता फ्लॅट संबंधीतांना परत करण्यात आलेल्या आहेत. तसेच आजपर्यंत 197 प्रकरणात कार्यवाही करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 34 अवैध सावकारांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून 21 प्रकरणी चौकशी सुरु आहे.