कृषी मंत्री अब्दुल सत्तार याचं भूखंड घोटाळ्याच प्रकरण सुरु असतांना आता शिंदे गटाचे दुसरे मंत्री दादा भुसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची डोकेदुखी ठरणार आहे. त्यांचा एका युवकाला मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहे.
या व्हिडीओत दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण करत आहे. माझा नग्न फोटो टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
अनंत करमुसे प्रकरण आणि एक महिलेने विनयभंगाचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच दादा भुसे यांचा व्हिडीओ समोर आल्याने मुख्यमंत्री आता कोणती कारवाई करणार, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस दाखल करणार? माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केली. सर्वोच्च न्यायालयात रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली. आता बोला.”
माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला जिने रात्री आपली भेट घेतली … ती च्या विरुद्ध जबरदस्ती करुन छोट्या पोरीना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे आपण माझे आयुष्य उध्वस्त करण्या साठी कारस्थान रचलात .. आपण मित्र हातो … विसरलात