Sunday, December 22, 2024
HomeMarathi News TodayCyclone Michaung | मिचॉन्ग चक्रीवादळाचा तामिळनाडूमध्ये मोठा फटका…आज आंध्रला धडकणार…

Cyclone Michaung | मिचॉन्ग चक्रीवादळाचा तामिळनाडूमध्ये मोठा फटका…आज आंध्रला धडकणार…

Cyclone Michaung : चक्रीवादळ मिचॉन्ग 2 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरातून सक्रिय झाले आणि 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशात पोहोचेल. मिचॉन्ग आंध्रमधील नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान धडकेल. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रमध्ये हाय अलर्ट आहे. सरकारने तिरुपती, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि काकीनाडा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्याच वेळी, 8 जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या प्रत्येकी 5 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये वादळाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. तामिळनाडूच्या जलसंपदा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नईमध्ये 70-80 वर्षांत पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे. या वादळामुळे चेन्नईत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

वादळामुळे जनजीवन विस्कळीत
वादळामुळे आतापर्यंत 204 ट्रेन आणि 70 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये NDRF च्या 21 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, लष्कराच्या 12 मद्रास युनिटने मुगलीवक्कम आणि मानापक्कम भागातून 500 लोकांना बाहेर काढले आहे. तटरक्षक दल आणि नौदल सज्ज ठेवण्यात आले आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने 4 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने खाजगी कंपन्यांना घरून काम करण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.

विमानतळ बंद, 70 उड्डाणे बेंगळुरूकडे वळवण्यात आली
पावसामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ जलमय झाले आहे. येथील धावपट्टीही पाण्यात बुडाली. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ते बंद ठेवले आहे. चेन्नईला येणारी उड्डाणे बेंगळुरूकडे वळवली जात आहेत. 70 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारी चेन्नईमध्ये कमी पाऊस झाला. मंगळवार आणि बुधवारीही कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. निवासी भागात ५ फूट पाणी साचले होते. त्यानंतर चेन्नईच्या पेरुंगलथूरमध्ये एक मगर रस्त्यावर फिरताना दिसली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: