Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यसायकलस्वाराला कारने धडक, उपचारादरम्यान मृत्यू; चालक फरार...

सायकलस्वाराला कारने धडक, उपचारादरम्यान मृत्यू; चालक फरार…

राजू कापसे

नागपूर: 13 फेब्रुवारी रोजी सायकलस्वाराला कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या 56 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान 24 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सुरेश गोडघाटे, वय 56 वर्षे, रा. श्रीहरी नगर, मानेवाडा असे आहे. ते हातमजुरीचे काम करत होते.

गोडघाटे 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.15 वाजता मनीषनगर येथून कामावरून घरी सायकलने जात होते. बेसाकडून ओमकार चौकाकडे जाताना सह्यांद्री लॉनसमोर जयवंत नगर कडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच ४०- सी क्यू ३९६४) त्यांना धडक दिली.

यात ते सायकलसह घासत जाऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यांना डोक्याला, पाठीला, छातीला, उजव्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना 24 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार अरुण कोल्हे करीत आहेत.

या घटनेमुळे गोडघाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: