Cyber Harassment : गुजरातमधील अहमदाबाद येथून हॅकिंग आणि सायबर फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अज्ञात व्यक्तींनी 27 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावर मेसेज करून 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. जेव्हा मुलीने खंडणी देण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांमध्ये तिच्या गप्पा आणि व्हिडिओ प्रसारित केले. या सायबर आरोपीला कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पीडितेने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, ती वरिष्ठ आयटी व्यावसायिक आहे. गेल्या एक वर्षापासून ती इन्स्टाग्राम वापरत होती. 20 सप्टेंबर रोजी तिला ‘Anastasia Goa’ नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर एक मेसेज आला. पीडितेने स्वत:ची ओळख पटवण्यासाठी मेसेजला उत्तर दिले. पीडितेने उत्तर दिल्यानंतर लगेचच २० हजार रुपयांची खंडणी मागितली. यासोबतच खंडणीची रक्कम न दिल्यास पीडिता आणि तिचा प्रियकर यांच्यातील अश्लील चॅट आणि व्हिडिओ त्यांच्या मित्रपरिवारात प्रसारित करू, अशी धमकीही त्यांनी दिली. जेव्हा पीडितेने याचा पुरावा मागितला तेव्हा त्याने तिच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या.
तरुणीचा प्रियकरावर संशय
पीडितेचा पहिला संशय तिच्या प्रियकरावर झाला. तिने तिच्या प्रियकराशी याबद्दल बोलले आणि विचारले की त्याने चॅटचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ कोणाशी शेअर केले आहेत का? पीडितेच्या प्रियकराने असे काहीही करण्यास नकार दिला. प्रियकराने पीडितेला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडितेने 19 डिसेंबरला पोलिसांत तक्रार करून एफआयआर दाखल केला.