Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनविराट-अनुष्का शर्माच्या मुलीचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

विराट-अनुष्का शर्माच्या मुलीचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

अनुष्का शर्मा नुकतीच पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासह वृंदावन येथील नीम करोली बाबाच्या आश्रमात पोहोचली. तेथे नीम करोली बाबा समाधी स्थळावर जाऊन पूजा करून आशीर्वाद घेतले. डिसेंबर २०२२ मध्ये देखील अनुष्का आणि विराट उत्तराखंडमधील कैंची धाम येथे नीम करोली बाबाच्या दर्शनासाठी गेले होते.

आता अनुष्का-विराट आणि त्यांची मुलगी वामिकाचा वृंदावन सहलीचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील वामिकाच्या क्यूट प्रँक्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पूजा करताना दिसत आहेत. यानंतर देवाचा आशीर्वाद म्हणून अनुष्का आणि वामिका कोहली यांना चुनरीने झाकले जाते. वामिकाचा 11 जानेवारीला (वामिकाचा वाढदिवस) दुसरा वाढदिवस आहे. वामिकाचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला.

अनुष्का आणि विराट कोहली हात जोडून पूजा करण्यात मग्न दिसत असताना वामिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पूजेनंतर अनुष्काने साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर विराट मुलगी वामिकाला आपल्या कडेवर घेऊन उभा राहिला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: