Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीवन विभागाकडून कट साईज सागवान जप्त...

वन विभागाकडून कट साईज सागवान जप्त…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत शेकापुर येथील दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी शेकापूर येथील एका शेतात सागवान कटसाइज माल लपवलेला असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून आलेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांचे नेतृत्वाखाली शेकापूर येथील शेतात सकाळीच धाड टाकली असता एकूण सुमारे 24 हजार रुपये किमतीचा कट साईज 0.273 घ. मी. सागवान कटसाईज माल वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या स्वरूपात आढळून आला.

सदर माल वन विभागाने जप्त करुन याप्रकरणी शेकापूर येथील एका इसमास संशयास्पद स्वरुपात चौकशीसाठी वन विभागाने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ढेंगे वनपाल आलेगाव हे करीत आहेत. वरील कार्यवाही मध्ये वनरक्षक लखन खोकड, गोपाल गायगोळ, कु आडोळे, कु वडजे, बाळासाहेब थोरात, विनोद पराते, अतुल तायडे, सुरजसे, प्रशांत डोंबळे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: