Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयसी एस एम प्रियानी निर्मल नरवडे हिचा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी...

सी एस एम प्रियानी निर्मल नरवडे हिचा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडून सत्कार…

होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल ची व ११महाराष्ट्र बटालियनची विद्यार्थिनीसी एस एम प्रियानी निर्मल नरवडे हिचा महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री भगतसिंह कोशारी यांच्यातर्फे दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ला राज्यभावनात उत्कृष्ट टि .एस .सी रायफल शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आणि महाराष्ट्राला प्रधानमंत्री मिनिस्टर बॅनर प्राप्त करून देण्यासाठी सिंहाचा वाटा असलेल्यामुळे सत्कार करण्यात आला त्यासाठी तिला रकमेच्या स्वरूपात चार हजार रुपये व सन्मान चिन्ह देण्यात आले.

श्री निर्मल नरवडे व सौ प्रिया नरवडे यांची जेष्ठ कन्याकुमारी प्रियाणी नरवडे हिने अखिल भारतीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल येथील इयत्ता नववी मधील प्रियाणी ही एनसीसी कॅडेट आहे. ११ महाराष्ट्र बटालियनची सार्जन प्रियाणी हिने दिल्ली येथे दिनांक १४ ते 2५ सप्टेंबर दरम्यान झालेल्या स्थल सैनिक शिबिरात रायफल शूटिंग मध्ये मानाचे प्रथम स्थान पटकावून सुवर्णपदक मिळवले. तसेच कलर कोट सुद्धा प्राप्त केला . सार्जन प्रियाणी या स्पर्धेकरता कठीण परिश्रम घेत विविध स्तरावर उदाहरणार्थ बटालियन, विभागीय ,राज्यस्तरीय प्रथम येत प्रियाणी हिने उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.

प्रियाणीला रायफल शूटिंग चे प्रत्यक्ष प्रशिक्षण तिचे वडील श्री निर्मल नरवडे यांनी दिले व प्रियांणीकडून भरपूर सराव सुद्धा करून घेत. तिला या पदावर आणण्यासाठी खूप परिश्रम त्यांनी घेतले प्रियाणीला सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागले आणि स्पर्धा जिंकण्यासाठी कठोर परिश्रम तिला घ्यावे लागले .गोल्डन मेडल प्राप्त करून आलेल्या प्रियाणीचा प्रथम रेल्वे स्टेशन येथे ११ महाराष्ट्रीयन बटालियच्या अधिकाऱ्यांतर्फे तर्फे ,होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर निता फर्नांडिस शाळेचे एनसीसी ए.एन.ओ तर्फे व तिच्या कुटुंबीयांतर्फे हार घालून पु
ष्पगुच्छ देऊन तसेच मिठाई वाटून भव्य स्वागत करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: