Monday, December 23, 2024
Homeराज्यदिग्रस बु च्या यात्रेत भाविकांची गर्दी...

दिग्रस बु च्या यात्रेत भाविकांची गर्दी…

वाहतूक कोंडी,पोलिसांचे दुर्लक्ष ,भाविक ,वाहनचालक त्रस्त

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या सोपीनाथ महाराज संस्थान दिग्रस बु येथील यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने दिग्रस बु बसस्थानक चौकावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन दीड ते अडीच तास ट्राफिक जाम झाली होती.याकडे पोलीस विभाग चे दुर्लक्षित झाल्याने भाविक भक्त,वाहनचालक त्रस्त झाले होते.

दिग्रस येथील यात्रेत मंदिरा पासून ते चान्नी फाटा कडे जाणाऱ्या रस्त्यावर बस,दुचाकी,बैलगाडी ,जड वाहन, चारचाकी गाडी सह कोंडी झाल्याने दीड किलोमीटर पर्यत वाहतूक ठप्प होती.काहींनी शेतातून मार्ग काढला तर काहींनी दिग्रस खुर्द मार्गे वाहणे वळवून आपापला रस्ता शोध घेत त्यांनी मार्ग काढला आहे.जवळपास २ तास वाहतुकीनी कोंडी झाल्याने अनेकांना मंदिरा पर्यत जाता आले नाही तर काहींना घरी परत जाता आले नसल्याचे तक्रारी करीत होते.

काही भाविकांनी तर ज्या ठिकाणी जाता आले नाही त्याठिकाणी चक्क वाहन उभे करून मार्ग काढला आहे.शनिवार रोजी अशीच वाहतूक कोंडी होऊ शकते तरी वरिष्ठ विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात यावा अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: