रामटेक – राजु कापसे
पारशिवनी तालुक्यातील कुंवारा भिवसेन हा आदिवासी समाजाचा यांचा देव असुन कुंवारा भिवसेन येथे पर्यटकाची गर्दी दिवसेनी दिवस वाढत असल्या मुळे कुंवारा भिवसेनचा विकासा करीता आमदार आशिष जयस्वाल यांनी कुंवारा भिवसेन व नवेगाव खैरी परिसराच्या विकासासाठी पूर्वी मोठ्या समाज भवनाचे निर्माण करण्यात आले होते.
त्यानंतर नव्याने आमदार झाल्यानंतर पुन्हा पर्यटन विकासासाठी रु.१५ कोटी कुंवारा भिवसेन विकासासाठी २ कोटी व कुंवारा भिवसेन महोत्सवसाठी २ कोटी असे एकुण रु.१९ कोटी निधी नव्याने मंजुर केलेला आहे, आणि भविष्यात ही रक्कम रु.२५ कोटी पर्यंत जाणार आहे.
वनविभागाला देखील कुंवारा भिवसेन येथून जल वाहतूक सुविधा सुरु करण्यासाठी २.५ कोटी रूपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. असे एकुण २४ कोटी रु.निधी कुंवारा भिवसेनला अतिशय उत्तम दर्जेचे तिर्थक्षेत्र करण्यासाठी आमदार आशिष जयस्वाल वचनबध्द असे म्हटले