Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीरामटेक | मोटर सायकल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर...

रामटेक | मोटर सायकल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई…

रामटेक – राजू कापसे

फिर्यादी नामे देविदास नामदेव मेंढे, वय ४० वर्ष रा. उदापुर ता. रामटेक हे दि. ०८/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०६/३० वा. दरम्यान नगरधन येथील पाणठेल्यावर खर्रा आणण्यासाठी गेले असता फिर्यादीने आपली मोटर सायकल पाणठेल्या जवळ ठेवली होती.

फिर्यादी यांची हिरो होन्डा सिडी डिलक्स काळया रंगाची लाल पट्टे असलेली जिचा क्रमांक MH-40-H-6309 असा असुन जिचा चेचीस क्रमांक 0723F26058 व इंजिन क्रमांक 07A22E16124 असा कोणीतरी अज्ञात चोराने नगरधन येथुन चोरून नेली आहे. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोस्टे रामटेक येथे अप क्र. ४५९ / २३ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद झाला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना दिनांक ११/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबरी मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आकाश पुरी नावाच्या इसमाकडे चोरीची मोटर सायकल असल्याचे माहिती मिळाली.

त्यानुसार सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे रामटेक परिसरातुन पथकाने सापळा रचून संशयीत इसम नामे- आकाश निरंजन पुरी, वय २१ वर्ष, रा. वार्ड नं. १, नगरधन, ता. रामटेक, जि. नागपूर याला ताब्यात घेतले.

त्याचे ताब्यातून चोरी केलेली एक मोटर सायकल क्र. १) एक हिरो होंडा CD डिलेक्स मो. सा. क्र. MH – ४०H- ६३०९ किंमती अंदाजे २५,००० /- रुपये २ ) नगदी ५००० /- रुपये जप्त करून त्याच्याकडून पो.स्टे. रामटेक येथील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.

पोलीस ठाणे रामटेक, नागपूर ग्रामीण १) अप क्र. ४५९ / २३ कलम ३७९ भा.द.वि. २) अप. क्र. ४५८/२३ कलम ३७९ भा.द.वि. हा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमूद आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन जप्त मुद्देमाल व कागदपत्रांसह पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे, पोलीस नायक विपीन गायधने, प्रमोद भोयर, नितेश पीपरोदे, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे यांनी पार पाडली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: