सांगली – ज्योती मोरे.
चोरी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर वस्तू विक्रीसाठी बाहेरगावी जात असलेल्या रमेश नामदेव चव्हाण. वय 53 राहणार उमराणी रोड, पारधी वस्ती, जत. या रेकॉर्डवरील, हव्या असलेल्या घरफोडी गुन्ह्यातील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बातमीदाराच्या माहितीनुसार जत एसटी स्टँड परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीत सोन्याच्या दागिन्यासह चांदीची मूर्ती मिळून आली.
सदर दागिने जत तालुक्यातील बोरगी गावात चोरल्याचं सांगितलं.यामध्ये पंचवीस हजार आठशे रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ 24 हजार 920 रुपयांची कर्णफुले 25 हजार 900 चे मनी मंगळसूत्र 33 हजार 950 रुपयांची अंगठी 41 हजार 690 रुपयांची आणखी एक अंगठी,पाच हजार पाचशे रुपयांची चांदीची मूर्ती असा एकूण 1 लाख 57 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीसह मुद्देमाल पुढील मुद्देमाल तपास उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, राजू शिरोळकर, जितेंद्र जाधव,राहुल जाधव,अजय बेंद्रे,संदीप पाटील, अमोल ऐदाळे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, संजय लवटे, सचिन कनप, कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.