Crime News/Telangana – एका जोडप्यात नसबंदीवरून वाद इतका वाढला की, त्यासाठी त्यांच्या दोन लहान मुलांचा बळी दिला गेला. नगरकुर्नूल जिल्ह्यातील येथम गावातील ओंकारने आपल्या पत्नीला नसबंदी करण्यास म्हटले, तिने नकार दिल्याने इतका नाराज झाला की, त्याने दोन्ही मुलांचा गळा चिरून खून केला. मुलांची हत्या केल्यानंतर त्याने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक के. मनोहर यांनी सांगितले की, ओंकार हा मजूर म्हणून काम करतो. त्याने आपला तीन वर्षांचा मुलगा चंदन आणि आठ महिन्यांचा विश्वनाथ यांची चाकूने वार करून हत्या केली.
ओंकारच्या पत्नीने पोलिसात जाऊन पती फोन उचलत नसल्याने दोन्ही मुलांची हत्या होण्याची भीती व्यक्त केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलीस तिघांचा शोध घेत येथाम येथील टॉवरजवळ पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता आणि ओंकारची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी ओंकारला तात्काळ हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
ओंकारच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, दोन्ही मुले बुधवारी दुचाकीवरून कुठेतरी जात होते आणि त्यादरम्यान नसबंदीवरून वाद झाला. पत्नीने नसबंदीला नकार दिल्याने ओंकार चिडला आणि तिला दुचाकीवरून ढकलून दिले. पत्नीने पोलिसांना सांगितले की, तो मुलांना दुचाकीवर घेऊन गेला आणि दोन्ही मुलांना मारेल, असे सांगितले. यानंतर पत्नीने वारंवार फोन करूनही ओंकारने फोन उचलला नाही, त्यानंतर पत्नी थेट पोलिस ठाण्यात गेली.