Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayCrime Story | बुलाती है…मगर जाने का नही!…तरी तो गेला अन…

Crime Story | बुलाती है…मगर जाने का नही!…तरी तो गेला अन…

Crime Story : ‘घरी कोणी नाही, ये…’तरुणीचे हे वाक्य एका तरुणाच्या मोठ अंगलट आलय, मैत्रिणीने त्याला बोलावताच तो तरुण आनंदाने भेटवस्तू घेऊन तिच्या घरी पोहोचला. पण भाऊ…त्या तरुणाची इतकी फसवणूक झाली की तो थेट हॉस्पिटलमध्ये गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथील आहे. जिथे तरुणाच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी त्याला चोर समजून बेदम मारहाण केली.

वास्तविक, तरुणीने त्या तरुणाला सांगितले की, घरी कोणी नाही, तू ये. अशा स्थितीत तो तरुण जेव्हा मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा सगळी गणितेच बदललेली दिसली. कारण प्रेयसीचीच माहिती चुकीची निघाली. अशा स्थितीत घरच्यांनी त्याला पकडून एवढी मारहाण केली की, त्या बिचाऱ्याला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले. तेथून त्यांना चांगल्या उपचारासाठी इतरत्र रेफर करण्यात आले.

‘आज तक’च्या वृत्तानुसार, हे धक्कादायक प्रकरण बांदा येथील बिसांडा पोलीस ठाण्यातील एका गावातील आहे. हा मुलगा व्यवसायाने डीजे आहे, तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये डीजेच्या ऑर्डर घेतो. तो एका रात्री कामावरून परतत असताना त्याला त्याच्या मैत्रिणीचा फोन आला, तिने त्याला सांगितले की तिचे आईवडील घरी नाहीत आणि घरी ये. मुलाला त्याच्या मैत्रिणीला घड्याळ भेट द्यायचे होते, म्हणून तो आनंदाने मैत्रिणीच्या घरी पोहोचला आणि आत जाण्यासाठी त्याने दरवाजा उघडताच तो स्तब्ध झाला. कारण सगळे घरीच होते.

मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी मुलाला पाहताच त्याला चोर समजून बेदम मारहाण केली. गोंधळ ऐकून शेजारी जमा झाले, त्यानंतर कसेबसे प्रकरण शांत झाले आणि कुटुंबीयांना समजावले. यानंतर मुलाने सर्व काही सांगितले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर बिसांडा पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी आनंद कुमार म्हणाले- एक तरुण कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी गेला होता आणि घरी परतत असताना एका मुलीच्या घरी गेला, त्यामुळे त्याच्यावर मारहाण करण्यात आली. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: