Crime News : आजकाल सोशल मीडियाच्या या जमान्यात लोकांमध्ये रील्स बनवण्याची क्रेझ आहे. यामध्ये घरगुती महिला जास्तच अग्रेसर झाल्या आहेत. पण रीलांच्या निमित्तानं कुणी कुणाला मारू शकतं का? यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होऊ शकते. पण बिहारच्या बेगुसरायमध्ये पतीने रील बनवण्यापासून रोखल्याने पत्नी इतकी नाराज झाली की तिने माहेरच्या मंडळींला सोबत घेवून पतीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि मेहुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे प्रकरण बेगुसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाफूट गावचे आहे. रविवारी रात्री उशिरा सासरच्या घरी आलेल्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने तरुणाच्या कुटुंबात कुठे खळबळ उडाली आहे. खोदवंदपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बेगुसराय येथे पाठवला. पत्नी आणि सासरच्या मंडळींनी तरुणाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृताच्या वडिलांनी सांगितले की, पत्नीला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याचे व्यसन होते आणि पती महेश्वर राय आपल्या पत्नीला असे करण्यास सतत मनाई करत असे. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याचा राग येऊन पत्नीने सासरच्या मंडळींसह महेश्वर रायची गळफास लावून हत्या केली.
सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरातील महेश्वर राय यांचे लग्न बेगुसराय जिल्ह्यातील फाफौत गावातील राणी कुमारीसोबत झाले होते.
लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते. दोघांना एक मुलगाही आहे. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून पत्नी राणी कुमारीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचे व्यसन लागले आहे. महेश्वर राय यांना पत्नीचे हे काम आवडले नाही. रविवारी रात्रीही त्याने नकार दिल्याने पत्नीच्या सांगण्यावरून सासरच्यांनी महेश्वरची हत्या केली. कोलकाता येथे राहणाऱ्या मृताच्या भावाला घटनेची माहिती मिळाली.
#Bihar पति ने रील्स बनाने से रोका तो बहन के साथ मिलकर मार डाला! आरोपी पत्नी और साली गिरफ्तार
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) January 8, 2024
बिहार के बेगूसराय में एक युवक को पत्नी को रील्स बनाने से रोकना महंगा पड़ गया. आरोप है कि पत्नी ने अपने घरवालों के संग मिलकर उसकी हत्या कर दी. मृतक कोलकाता में नौकरी करता था और हाल ही में… pic.twitter.com/ct8DQkuNvB
याबाबत मृताच्या भावाने गावकऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर गावकरी फाफौत येथे पोहोचले तेव्हा सासरच्या घरातून महेश्वर राय यांचा मृतदेह सापडला. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फाफौत गावातील महेश्वरच्या सासरच्या घरातून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी बेगुसराय येथे पाठवला. पोलीस स्टेशनचे प्रमुख मिथिलेश कुमार यांनी सांगितले की, तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच महेश्वरची हत्या झाली की आत्महत्या हे स्पष्ट होईल. सध्या पोलीस मृताची पत्नी आणि मेहुण्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.