Monday, January 6, 2025
Homeगुन्हेगारीCricket fever | मुलाने फायनल सामन्यादरम्यान टीव्ही बंद केला आणि बापाने रागाच्या...

Cricket fever | मुलाने फायनल सामन्यादरम्यान टीव्ही बंद केला आणि बापाने रागाच्या भरात मुलाचा जीव घेतला…

Cricket fever : संपूर्ण देशाला सहा आठवड्यांहून अधिक काळ खिळवून ठेवणारा ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रविवारी खेळला गेला आणि क्रिकेट चाहत्यांची उत्कंठाही शिगेला पोहोचली. स्पर्धेच्या सुरुवातीपासून अपराजित असलेल्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

या विश्वचषक आणि अंतिम सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यांचा थरार असा होता की, उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका व्यक्तीने आपल्याच मुलाची हत्या केली कारण मुलाने सामन्यादरम्यान टीव्ही बंद केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रसाद कानपूर येथील त्यांच्या घरी सामना पाहत असताना त्यांचा मुलगा दीपकने त्यांला जेवण बनवण्याची विनंती केली. गणेश प्रसाद यांनी मुलाचे ऐकले नाही, तेव्हा दीपकने टीव्ही बंद केला, त्यावरून वाद सुरू झाला.

काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि दारूच्या नशेत सामना पाहणाऱ्या गणेशने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून दीपकचा खून केला. यानंतर गणेश घरातून पळून गेला, त्याला कानपूर पोलिसांनी सोमवारी अटक केली.

दीपकचा मृतदेह एका नातेवाईकाला पायऱ्यांवर पडलेला आढळून आला. क्रिकेट मॅच पाहण्यावरून झालेल्या वादातून हत्येमागचे कारण असल्याचे सध्या तरी दिसते आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चकेरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ब्रिजनारायण सिंह यांनी सांगितले की, हत्येसाठी मोबाईल चार्जरची केबल वापरली गेली. दीपकचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

पिता-पुत्र अनेकदा दारू प्यायचे आणि एकमेकांशी भांडायचे, असे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात दीपकची आईही घरातून निघून गेली होती, त्यावेळी दीपकने तिच्यावर हात उचलला होता.

Dhiraj Gholap
Dhiraj Gholaphttp://mahavoicenews.com
मी पत्रकार धीरज घोलप, विक्रोळी-मुंबई येथे गेल्या १५ वर्षापासून पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहे. महाव्हॉइस या लोकप्रिय वाहिनी मध्ये गेल्या ५ वर्षापासून मुंबईसारख्या शहरांमध्ये सक्रिय पत्रकारीता करीत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: