Sunday, November 17, 2024
Homeगुन्हेगारीगांजा विक्री प्रकरणात चुलत भावाला गोवणे अंगलट आले...कट कारस्थान रचणारे दोघे स्वतःच...

गांजा विक्री प्रकरणात चुलत भावाला गोवणे अंगलट आले…कट कारस्थान रचणारे दोघे स्वतःच गुन्हेगार बनले…

संजय आठवले, आकोट

सख्ख्या चुलत भावाशी पक्की खुन्नस ठेवून त्याला गांजा बाळगणे व विक्री करणे या आरोपाखाली अटक करविण्यासाठी रचलेल्या कारस्थानाचा आकोट पोलीसानी पर्दाफाश केल्याने हे कारस्थान करणारा व त्याला सहकार्य करणारा ह्या दोघांवरच गून्हे दाखल झाले आहेत. मात्र निर्दोष असुनही या आरोपातील आरोपीला ऊगाच पोलिस कार्यवाही व सामाजिक टोमणेबाजीचा त्रास सहन करावा लागला आहे.

या घटनेची हकिगत अशी कि, आकोट तालूक्यातील अकोलखेड येथिल होतकरु युवक शुभम गजानन बोचे हा MH 30BD 4172 हे वाहन भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. त्याचे काकांचा देहांत झाल्याने त्यांची मुलगी व मुलगा मयूर हे दोघेही शुभमच्याच कूटूंबात राहतात. शुभम व्यवसायात गुंतला. परंतु मयूर टारगट युवकांचे नादी लागला. ह्याच नादाने तो कर्जबाजारीही झाला. ऊद्योग व्यवसायाशी वाकडे असल्याने त्याला ते कर्ज फेडणे शक्य होत नव्हते. आणि कर्ज वसुलीचा तगादा लावणारे स्वस्थ बसत नव्हते. अशातच त्याच्या बदचाल मित्रांनी त्याला त्याचे व त्याचे बहिणीचे संयुक्त नावे असलेले शेत विकण्याचा बदसल्ला दिला. बददिमाग मयूरला हा सल्ला भावल्याने त्याने आपले बहिणीला शेत विकण्यासाठी स्वाक्षरी देण्याची गळ घातली. चिड आणणारी बाब म्हणजे त्याने त्याच्या बहिणीशी ही चर्चा त्याच्या वाह्यात मित्रांकरवी केली. त्याच्या ह्या नालायक वर्तनाला शुभमने विरोध केला. त्याने एक एप्रिल रोजी आपल्या बहिणीला आकोट ग्रामिण पोलिस ठाण्यात नेऊन मयुर व त्याचा मित्र शाहिद शा ईजार शा यांचेविरोधात तक्रार दिली.

त्या आधारे ग्रामिण ठाणेदार नितिन देशमुख यानी ४ एप्रिल रोजी ह्या दोघाना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. या प्रकाराने मयूर व शाहीद हे दोघेही बिथरले. त्यानी शुभमला अडकविण्याचा कट रचला. ह्या सा-या घटनाचक्रात शुभमच्या वाहनाचे टायर बदलावयाचे असल्याने त्याने आपले वाहन आकोट वन विभागातील कर्मचा-याचे वसाहतीतील आपल्या मित्राचे घरासमोर ठेवले होते. मयूरचा मित्र शाहीद ह्याने बरेच दिवस शुभमकडे वाहन चालक म्हणून काम केले होते. त्यामूळे त्याचेकडे ह्या वाहनाची एक चावी होती. त्याचा लाभ ऊचलीत मयूर व शाहिद यानी शुभमला गांजा प्रकरणात अडकविण्याचा कट रचला. त्यानुसार त्यानी शुभमच्या वाहनात गुपचूपपणे गांजा नेऊन ठेवला. त्यानंतर त्यानी उपविभागिय पोलिस अधिकारी रितू खोखर याना फोन करुन ह्या वाहनात ८/१० किलो गांजा असल्याची खबर दिली.

ही खबर मिळताच रितु खोखर ह्या पोलिस ताफ्यासह जातीने घटनास्थळी पोचल्या. तेथे शुभम व या घडीला त्याचा वाहन चालक असलेल्या विशाल गजानन राऊत ह्याना घटनास्थळी बोलाविले. तिथे रीतसर पंचनामा करुन शुभम व विशाल याना अटक करण्यात आली. हा सारा प्रकार ४ जुलै रोजी झाला. त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे ५ जुलै रोजी शुभम व विशाल याना आकोट न्यायालयाने जामिनावर सोडले. त्यानंतर शुभमने आपल्या बयानात मयूर व त्याचा सहकारी शाहिद यांचा ईतिहास कथन केला. हा सारा घटनाक्रम घडत असताना आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे हे रजेवर होते. ते पो.स्टे. ला दाखल होताच त्यानी या प्रकरणात मयूर व शाहिद यांचा हात असल्याचे ओळखले. म्हणून त्यानी शुभम व विशालसह सहआरोपी म्हणून मयूर व शाहिद यांचे विरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोऊनि राजेश जवरे यांचेकडे सोपविला. एक होतकरु युवक नाहक या गुन्ह्यात अडकविला जात असल्याचे लक्षात आल्याने उपविभागिय पोलीस अधिकारी रितु खोखर, शहर ठाणेदार प्रकाश अहिरे, ग्रामिण ठाणेदार नितिन देशमुख व तपास अधिकारी पोऊनी राजेश जवरे ह्यानी हे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले. तपासातील आरोपी अमरावतीला असल्याचे कळताच पोऊनी राजेश जवरे यानी आपल्या ताफ्यासह अमरावतीस जाऊन मयूर व शाहीद या दोघांना शिताफीने पकडले. दोघानीही पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. शाहिदने शुभमच्या वाहनाची चावीही पोलीसांच्या सूपूर्द केली. आणि या गुन्ह्यात सहआरोपी असलेले मयूर बोचे व शाहिद शा हे दोघे मूख्य आरोपी बनले. ३० जुलै रोजी या दोघाना आकोट न्यायालयाने जामिन दिला. अशाप्रकारे आकोट पोलीसानी एका कारस्थानाचा पर्दाफाश करुन एका निर्दोष युवकावर लागलेला कलंक पुसण्यास मोठी मदत केली. सोबतच नालायक मित्रांच्या संगतीने सख्ख्या भावास फसविणा-या बिनडोक अपराध्यांस न्यायालयापर्यंत पोचविले आहे. पुढील तपासात शाहिदने आणलेल्या गांजाचा ठावठिकाणा शोधण्यात येणार आहे. ह्या सोबतच या प्रकरणी ऊगीच भरडले गेलेले शुभम गजानन बोचे व विशाल गजानन राऊत याना न्यायालयाद्वारे निर्दोष सोडण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: