Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीझाडावर गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या!...रामटेक गडमंदिर अंबाळा वनपरिसरातील घटना...

झाडावर गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या!…रामटेक गडमंदिर अंबाळा वनपरिसरातील घटना…

रामटेक – राजू कापसे

गडमंदिर रामटेक अंबाळा परिसरातील वनभागात प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि. २० डिसेंबर ला सायंकाळच्या सुमारास उघडकिस आली.

सविस्तर वृत्त असे की, रामटेक अंबाळाकडून गडमंदिरकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या वनविभागाच्या वनचरगृहापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर जंगल परिसरात बाहेर गावावरून येथे आलेल्या एका विवाहित महिला व एका अविवाहित मुलगा असलेल्या प्रेमीयुगलाने झाडाच्या फांद्याला गळफास घेऊन सोबत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार २० डिसेंबर २०२२ च्या सायंकाळी उघडकिस आली.

यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रामटेक पोलिसांनी पंचनामा करून प्रेमीयुगलांचे मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथील शवविच्छेदन केंद्रात पाठविले. बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ ला सकाळी ११ वाजेनंतर शवविच्छेदन करण्यात आले. मिळालेल्या माहितीप्रमाणे, अविवाहित मृत मुलाचे नाव, मयूर गजानन मानुसमारे वय-३० वर्षे व विवाहित मृत महिला कांचन ज्ञानेश्वर रंधई वय ३३ वर्षे, दोन्ही राहणार सावंगी (देवळी) त. हिंगणा जि. नागपूर अशी आहे. कांचन हिला दोन अपत्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. मयूर याच्या प्रेमात पडलेली कांचन दोन महिन्यापासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. परंतु मागील काही दिवसांपासून तिची परत पतीकडे जाण्याची इच्छा ती पतीकडे फोनवरून व्यक्त करत होती. पती-पत्नीचे फोनवरून बोलणे होत असल्याचे पती ज्ञानेश्वर यांनी सांगितले.

रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास उपक्रम हाती घेतला आहे.पोलिस निरीक्षक प्रमोद मक्केश्वर यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संजय खोब्रागडे पो. कास्टेबल शेषराज उके पुढील तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: