Monday, December 23, 2024
Homeराजकीयभ्रष्टाचार मुक्ततेची सुरुवात नागपूर शहरातून व्हावी…राज्यपाल बनवरीलाल पुरोहित

भ्रष्टाचार मुक्ततेची सुरुवात नागपूर शहरातून व्हावी…राज्यपाल बनवरीलाल पुरोहित

वनामतीत रंगला सार्थकचा समाजसेवकांचा सन्मान सोहळा….

नागपूर -शरद नागदेवे,

नागपूर : मनुष्याने साधी राहणी व जीवनशैली ठेवत जीवन जगले तर देशातील भ्रष्टाचार संपवू शकतो आणि भारत जगात विश्वगुरू देश म्हणून समोर येण्यास वेळ लागणार नाही. भ्रष्टाचारमुक्त देशाची सुरुवात ही नागपूर शहरातून करावी असे आवाहन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

सार्थक फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, जन आक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वनामतीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार होते, तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री रमेशचंद्र बंग व्यासपीठावर उपस्थित होते , फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, कोशाध्यक्ष संजय पालिवाल, विश्वस्त राजाभाऊ टांकसाळे उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानपत्र असे या सत्काराचे स्वरूप होते. यावेळी बनवारीलाल पुरोहित म्हणाले, मनुष्याला जेवढे मिळाले त्यात समाधान मानले पाहिजे. भ्रष्टाचार करुन जमविलेला पैसा हा कधीच टिकत नाही. साधी जीवनशैली राहिली आणि प्रामाणिकपणे समाजात काम केले तर समाजातील आणि पर्यायाने देशातील भ्रष्टाचार कमी होईल आणि भारत विश्व गुरू होण्यास वेळ लागणार नाही. नागपूर हे मिनी इंडिया आहे त्यामुळे याची सुरुवात नागपुरातून व्हावी आणि त्यासाठी समाजात आदर्श असलेल्या पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नागपूरमध्ये सकारात्मक काम करणारी मंडळी आहे. नागपूरचा इतिहास लिहिण्यासारखा आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांचे आदरतिथ्य करणे आणि त्यांच्याशी संबंध जुळवून ठेवणे ही नागपूरची संस्कृती असल्याचे पुरोहित म्हणाले.

यावेळी सुनील केदार म्हणाले, माणसाच्या आपल्या जीवनात स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी जगले पाहिजे. देशाचा अमृत महोत्सव सुरू असताना आपण आपल्या विषयी खूप काही बोललो. शासनाने कायदे केले मात्र त्यातून सामाजिक प्रश्न सुटले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी गिरीश गांधी म्हणाले, शहराची ओळख येथील माणसांमुळे असते. वेग वेगळ्या वाटा निवडून काम करतात अशांमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळते. माणस येतात आणि जातात. किती खासदार व नेते झाले हे लोकांना आठवणार नाही. मात्र, समाजात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती लोकांच्या नेहमी आठवणीत राहतील असेही गांधी म्हणाले. यावेळी रमेश बंग, विष्णू मनोहर, रवींद्र कासखेडीकर व अमित समर्थ यांची भाषणे झाली.

या सत्कार सोहळ्याच्या वेळी सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, आमदार गिरीश व्यास, माहिती आयुक्त राहुल पांडे, बुट्टेबोरी इंडस्ट्रियल असोसिएशनचे प्रदीप खंडेलवाल ,अजय पाटील,जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग यांनी केले. प्रस्ताविक सार्थक फाउंडेशन चे सचिव विनोद चतुर्वेदी यांनी तर सूत्रसंचालन सार्थकचे सुधीर बाहेती यांनी केले.आभार सार्थक च्या पंकज महाजन यांनी मानले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: