Sunday, December 22, 2024
Homeराजकीयप्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील सर्वे नंबर ४६/२ या मनपाच्या खुल्या...

प्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील सर्वे नंबर ४६/२ या मनपाच्या खुल्या भूखंडाचे सातबाराला नाव लावण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांची आयुक्तांकडे मागणी…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील महापालिकेच्या मालकिचा असणाऱ्या सर्वे नंबर 46/2 या खुल्या भूखंडाचे सात बाराला नाव लावण्यात यावे अशी मागणी आज नगरसेवक विष्णू माने यांनी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

दरम्यान सध्या या भूखंडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असून सदर मिळकतीमध्ये सहाय्यक संचालक नगररचना यांनी अधिकृत लेआउट मंजूर केला तरीही या भूखंडावर मनपाचे नाव लावले गेलेले नाही आणि कब्जा पट्टी ताबा पावती केलेली नाही. तरी या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक माने यांनी यावेळी केलीय.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: