Saturday, November 23, 2024
HomeAutoआता महामंडळाने थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क पाच हजार इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत...

आता महामंडळाने थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क पाच हजार इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे…

अमोल साबळे

खासगी बसेसकडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना एसटी बसकडे वळविण्याचे भरकस प्रयत्न राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने चालविले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या योजनाही सुरू करण्यात आल्या असून, आता महामंडळाने थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क पाच हजार इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या रंगात रंगलेल्या मात्र आतून आलिशान असलेल्या बसगाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.

उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या १५,४०० गाड्या आहेत. (त्यातील अनेक बसगाड्यांची कालमर्यादा संपलेली आहे.) तीन वर्षांपूर्वी त्यांची संख्या सुमारे १८ हजार होती. यातील काही बसगाड्यांची कालमर्यादा संपली. कोरोनामुळे काही गाड्या बंद पडल्या- खराब झाल्या. तर नंतर कर्मचाऱ्यांच्या संपाने काही गाड्यांना फटका बसला.

अशाप्रकारे २०२० ते २०२३ या तीन वर्षांत परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील भंगार आणि निकामी झाल्याने सुमारे २२०० गाड्या कमी झाल्या. त्यामुळे एसटीच्या दैनंदिन उत्पन्नावरही त्याचा परिणाम झाला असून, उर्वरित गाड्यांच्या भरवशावर एसटीची दाैडभाग तसेच खर्चाचा कारभार चालविला जात आहे.

गेल्या महिन्यात राज्य सरकारने एसटीकडे प्रवाशांना वळविण्यासाठी एक चांगली योजना सुरू केली. ती म्हणजे, महिला-मुलींना सरसकट अर्ध्या तिकीट भाड्याची सवलत देण्यात आली. या योजनेमुळे एसटीत महिला-मुलींच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या प्रवाशांची संख्या वाढली असून, उत्पन्नातही भर पडली आहे.

मात्र, सध्या सुरू असलेल्या अनेक गाड्यांचे आरोग्य चांगले नाही. त्या खडखड करत, अडखळत धावतात. मध्येच कुठेही बंद पडतात. अनेक गाड्यांना अपघात होतो, तर काहींना आगही लागते. परिणामी एसटीपासून अजूनही अनेक प्रवासी दूरच आहेत. ते एसटीपेक्षा खासगी बसला (ट्रॅव्हल्स) पसंती दर्शवितात.

हा प्रकार लक्षात आल्यामुळे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांना एसटीकडे वळविण्यासाठी काय करावे लागेल, त्यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी दिला होता. त्यात नवीन बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा मुख्य मुद्दा होता.

भाडेतत्त्वावर टाकली जाईल कात
एसटीच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच हजारांवर नवीन बसगाड्या खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने भाडेतत्त्वावर या गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार, ५१५० नवीन बसगाड्या भाड्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अर्थात् एसटीला बसमालक गाड्यांसोबतच त्यांचे ड्रायव्हरही देतील. या गाड्यांना रंग एसटीचा राहील. डिझेल खर्च अन् देखभाल एसटी महामंडळ करेल. तूर्त दर फायनल झाले नसले, तरी प्रति किलोमीटर ४० ते ४२ रुपयांत डील फायनल करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: