न्यूज डेस्क – ओडिशा राज्यात काल शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडी या तीन गाड्यांचा झालेला विचित्र अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे समजते. हा रेल्वे अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात आहे.
शालीमार–चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस १० ते १२ डबे आणि बंगळुरु–हावडा सुपरफास्ट एस्कप्रेसचे तीन–चार डबे ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ एकमेकांवर धडकले. याआधीही 14 फेब्रुवारी 2009 म्हणजे 14 वर्षांपूर्वी योगायोगाने रेल्वे अर्थसंकल्पाच्या दिवशीच घडला. आणखी एक योगायोग म्हणजे त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेसलाच ओडिशामध्ये हा अपघात झाला होता. हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसचे 14 डब्बे ओडिशाच्या जाजपूर रेल्वे स्टेशनजवळ त्यावेळी घसरले होते. या घटनेत 16 जण मृत्युमुखी पडले, तर 50 जखमी झाले होते.
या घटनेने संपूर्ण देशात शोक लहर सुरु असून अनेकजण सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये प्रामुख्याने कवच नावाच्या तंत्रज्ञान रेल्वेने सुरु केले होते. या तंत्रज्ञानाचा मोठा गाजावाजा केला होता. भारतीय रेल्वेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक video पोस्ट केला होता, ज्यामध्ये कवच दोन ट्रेनला टक्कर होण्यापासून कसे रोखते हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते.
समोरून एखादी ट्रेन येत असेल तर ट्रेनचा ऑटोमॅटिक ब्रेक ३०० मीटर आधी लावला जातो. मग ओरिसात जो रेल्वे अपघात झाला, त्यात कवच नावाचे तंत्रज्ञान बसवले नव्हते, ते बसवले तर एवढा मोठा रेल्वे अपघात कसा घडला? असे प्रश्न सामान्य नागरिक सोशल मिडीयावर विचारत आहे.
अगर 400 मीटर की दूरी पर #Kavach ट्रेन को रोक देता है तो उडीसा मे तीन ट्रेन भिडंत कैसे.? pic.twitter.com/9cDtpqaB3t
— SNEHAL PATEL (@Patel18snehal) June 3, 2023