Thursday, September 19, 2024
Homeराजकीयखासदार प्रफुलभाई पटेलांच्या सहकार्याने येणाऱ्या वर्षात तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आपला क्षेत्र...

खासदार प्रफुलभाई पटेलांच्या सहकार्याने येणाऱ्या वर्षात तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आपला क्षेत्र विकासाच्या बाबतीत नंबर १ असेल : जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथडे…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया तिरोडा तालुक्यातील सुकळी डाकराम क्षेत्रात सध्या दिवाळी व मंढई निमित्त आयोजित कार्यक्रमांचा धुमाळा असतांना व जनतेच्या कामात व्यस्त असतांना सुध्दा जनतेच्या प्रेमापोटी जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथडे प्रत्येक कार्यक्रमांना भेट देतांनी दिसतात आहे.

१७ नोव्हेंबरला मौजा गुमाधावडा़ येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपस्थित राहत जनतेला संबोधित केले व परंपरागत सभ्यता, संस्कृतीचे जतन करण्यासाठी सुद्धा आव्हाहन केले.

त्याच बरोबर रावनघाट(मेंढा) येथे मराठी लावनीच्या क्रार्यक्रमाला उपस्थित राहुन प्रेक्षक बांधवांना संबोधित केले असता त्यांनी सांगितले की खासदार प्रफुलभाई पटेलांच्या सहकार्याने येणाऱ्या वर्षात आपला क्षेत्र विकासाच्या बाबतीत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नंबर १ चा क्षेत्र असेल फक्त तुमची असीच साथ व प्रेम असु द्या असे ते म्हणाले जगदीश बावनथडे यांच्या सह मेंढा, गुमाधावड्यातील तमाम जनता, प्रेक्षक बांधव आणी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: