तीन मालक व दिवाणजी सह चौघा विरोधात गुन्हा दाखल
गोकुळ शिरगाव – राजेंद्र ढाले
उजळाईवाडी येथील एका भंगार व्यावसायिकाला कागदावर वजन वाढवून फसवणूक केल्याप्रकरणी दिवाणजी व एका भांडी दुकानदारा विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून भांडी दुकानदाराने भंगार व्यवसायिक बंधू विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही फिर्यादीमध्ये एकूण पंधरा लाख ४८ हजार १६२ रुपयाचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले असून दिवाणजी, ३ व्यावसायिक आशा चौघा विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उजळाईवाडी (ता करवीर) येथील भंगार व्यावसायिक दिलीप सुरेश बैरानी (रा.प्रभाकर आपारमेंट, शाहूपुरी ५वी गल्ली कोल्हापूर) यांनी गेल्या चार वर्षापासून आपल्या उजळाईवाडी येथील तिरुपती मेटल नावाच्या भंगार दुकानात त्यांचे दुकानातील दिवाणजी अजित लहू खोत ( खोतवाडी ता. पन्हाळा) व गोविंद परशुराम नेकनार (आयटीआय कॉलेज जवळ, शांतीसागर कॉलनी, मजगाव, ता. जि. बेळगाव ,कर्नाटक) या स्क्रॅप पुरवणाऱ्या व्यावसायिकाने दिवाणजी अजित यांच्याशी संगणमत करून आहे.
त्या वजनापेक्षा कागदावर वजन वाढवून ११ लाख ६६ हजार रुपयांचा अपहार केला. सदरची रक्कम अजित खोत व गोविंद नेकनार या दोघांनी निम्मी रक्कम वाटून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिवाणजी अजित खोत यांनी रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही परत न केल्याने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसऱ्या फिर्यादीत गोविंद मेटल या भांडी विक्री दुकानाचे मालक गोविंद नेकणार (वरील फिर्यादीतील आरोपी) यांनी राम बैरानी व सुरेश बैरानी (दोघे रा. नारायण पार्क, प्रवीण पेट्रोल पंपाजवळ उजळाईवाडी) यांच्याविरुद्ध ३८२१६१ रुपये दराचा अल्युमिनियम, तांबे, पितळ व इतर धातूच्या भांड्यांचा ७०० किलो वजनाचा स्क्रॅपचा माल तिरुपती मेटल या बैरानी बंधूंच्या दुकानात १५ सप्टेंबर २२ रोजी विकला होता.
सदर मालाचे पैसे फिर्यादी यांना न देता त्यांना शिवीगाळ करून हातपाय मोडण्याची धमकी देऊन संगणमताने विश्वास संपादन करून वरील मालाचा अपहार अपहर करून फसवणूक केले बाबत फिर्यादी यांनी मा. न्यायदंडाधिकारी, कोल्हापूर यांचे कडे फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) प्रमाणे अर्ज करून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बैरानी बंधू विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. .सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नायक सनदी व पोलीस नायक कांबळे करीत आहेत.