Saturday, December 21, 2024
Homeराज्यकंत्राटी कामगार आक्रोश व्यक्त करणार तांत्रिक अप्रेन्टिस, कंत्राटी कामगार असोसिएशनचे हिवाळी अधिवेशनावर...

कंत्राटी कामगार आक्रोश व्यक्त करणार तांत्रिक अप्रेन्टिस, कंत्राटी कामगार असोसिएशनचे हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी धरणे आंदोलन…

नरखेड – महावितरण , महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व तिन्ही कंपनीचे प्रशासन उदासीन असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात दिली आहे.

तिन्ही कपंनीतील कंत्राटी कामगारांकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावे, कंत्राटी कामगारांना देण्यात येणारा 20 टक्के विशेष पुरक भत्त्यामध्ये वाढ करून 40 टक्के विशेष पुरक भत्ता देण्यात यावा,कंत्राटी कामगारांना नियमित विज कामगारांप्रमाणे गृप ईन्शुरन्स कवच देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना नियमित विज कामगारांप्रमाणे अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा,

कंत्राटी कामगारांना ईतर राज्याप्रमाणे नियमित सेवेत कायम करण्यात यावे तसेच त्यांना आरक्षण देण्यात यावे,कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीने कामावर घेवुन शाश्वत रोजगारांची हमी दयावी,महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी करीता तिन्ही कंपनीमध्ये चुतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरती मध्ये 100 टक्के आरक्षण देण्यात यावे,

शासनाने सरळ सेवा भरती करीता वयोमर्यादेमध्ये वाढ केली आहे. परंतु महावितरण कंपनीमध्ये अद्याप या बाबत काहीच कार्यवाही केली नाही. महावितरण सरळ सेवा भरती प्रकीयमध्ये वयोमर्यादा मध्ये वाढ करण्यात यावी,तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांनाकडुन कंत्राटदार मासिक वेतनामधुन रू 4000 ते 6000 ची मागणी केली जाते. पैसे परत न केल्यास त्यांना कामावरून कमी केल्या जात आहे. नियमाप्रमाणे वेतन फक्त कागदोपत्रीच दाखविल्या जाते.

प्रत्येक्षात मात्र कंत्राटी कामगारांची आर्थीक पिळवणुक करण्यात येते, कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधनाचा पुरवठा करण्यात येत नाही. त्यांना सुरक्षा साधने पुरविण्यात यावे, महावितरण कंपनीतील तांत्रिक प्रर्वगातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्त असलेल्या पदावर कंत्राटी कामगार 95 टक्के व 85 टक्के भरणा केला जातो. सदरहु रिक्त असलेल्या पदाच्या 100 टक्के जागावर कंत्राटी कामगार भरती करण्यात यावी. आदी प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

तरी सुद्धा कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्याने तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांचे प्रचंड प्रमाणात आक्रोश निर्माण झाला असल्याने हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दि.०८डिसेंबर २०२३रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रिय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर.पवार,गोपाळ गाडगे,सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उप सरचिटणीस नितिन भैय्या चव्हाण, शिवाजी शिवणेचारी,संजय उगले,राज्य सचिव आनंद जगताप, संघटक महेश हिवराळे, कोषाध्यक्ष गजानन अघम,

तांत्रिक टाईम संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, संस्थापक अध्यक्ष किरण कहाळे, सरचिटणीस प्रकाश वाघ यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.या कंत्राटी कामगारांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस राहिल शेख, उप सरचिटणीस प्रताप खंडारे, कोषाध्यक्ष अतुल थेर, उपाध्यक्ष दत्तात्रय धायगुडे, अनिवेश देशमुख,कुणाल जिचकार,मयुर कोठे, दिनेश काळे,विक्की पाचघरे, श्याम भारती, विकास ठुसे, गौरव वानखेडे, अभिजित वानखेडे, प्रीतम पाटील, बाळू चवरे, शाम भारती, गजानन खंदारे, राजू गायकवाड, गोपाल इंगोले, चंदू कागलकर यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: