Monday, December 23, 2024
Homeविविधग्राहक सेवा आणि वीज देयक वसूली यांमध्ये सातत्य ठेवावे; मुख्य अभियंता, ज्ञानेश...

ग्राहक सेवा आणि वीज देयक वसूली यांमध्ये सातत्य ठेवावे; मुख्य अभियंता, ज्ञानेश कुलकर्णी…

उत्कृष्ठ काम करणारे विभाग,उपविभाग आणि शाखा कार्यालयाचा गौरव…

अमरावती – वीज ही मुलभूत गरज बनलेली आहे. त्यामुळे महावितरणच्या सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेत होतो. त्यामुळे ग्राहक सेवेत सातत्य असले पाहिजे.तसेच वितरीत केलेल्या विजेच्या नियमित देयक वसूलीवरच महावितरणची आर्थिक परिस्थिती अवलंबून असल्याने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देवून वीज देयक वेळेत भरण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले.

विद्युत भवन अमरावती येथे आयोजित ग्राहकसेवा,महसुल वाढ आणि वसूली कार्यक्षमतेत मागील आर्थिक वर्षात सांघिकपणे उत्कृष्ठ कामगीरी करणारे अमरावती जिल्ह्यातील महावितरणचे विभाग,उपविभाग आणि शाखा कार्यालयाच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे ,कार्यकारी अभियंते भारतभूषण औघड,प्रतिक्षा शंभरकर,आनंद काटकर,अनिरूध्द आलेगावकर,संजय शृंगारे,प्रशांत काकडे,व्यवस्थापक वित्त व लेखा यज्ञेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

वर्ष २०२२ -२३ मध्ये ग्राहकसेवेला प्राधान्य देत घरगुती,औद्योगिक,वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांच्या वीज देयक वसूलीत सातत्य ठेवत  कार्यकारी अभियंता संजय शृंगारे यांच्या नेतृत्वात अचलपूर विभागाने  मार्च २०२२ च्या थकीत १३ कोटी २८ लाखाच्या वीजबिलातून ४ कोटी ७१ लाख वीज देयके ग्राहकांकडून भरून घेतलीत,तर कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर यांच्या नेतृत्वात अमरावती ग्रामिण विभागानेही वीजबिल वसूलीत सातत्य ठेवत मार्च २०२२ ची थकबाकी ४ कोटी ७ लाखाने कमी केली.त्यामुळे या दोन्ही विभागांना मुख्य अभियंता यांच्याहस्ते सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याशिवाय उपविभागानुसार ग्राहकांना देण्यात आलेली सेवा आणि केलेल्या वीजबिलाच्या वसूलीनुसार उपकार्यकारी अभियंता वरूड १ राजेश दाभाडे यांनी २२ गावे थकबाकीमुक्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याचबरोबर उपकार्यकारी अभियंता धामणगाव रेल्वे उमेश राठोड,उपकार्यकारी अभियंता तिवसा आर.डी.पाटील,उपकार्यकारी अभियंता अंजनगावसुर्जी एस.सी.नंदवंशी,उपकार्यकारी अभियंता शेंदुरजनाघाट अमोल इंगळे,उपकार्यकारी अभियंता अचलपूर सिटी जयंत घाटे,उपकार्यकारी अभियंता नांदगाव खंडेश्वर पी.एन.पाटील, उपकार्यकारी अभियंता अचलपूर कॅंम्प ज्ञानेश्वर अंबाडकर यांना त्या उपविभागाच्या सांघिक कामगीरीबद्दल मुख्य अभियंता यांच्या हस्ते अनुक्रमे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याचबरोबर उत्कृष्ठ कामगीरी करणारे शाखा कार्यालयाचा गौरव करण्यात आला.यामध्ये पथ्रोटचे शांखाप्रमुख डी.के.मोंडेकर,तळेगावचे शाखाप्रमुख एम.बी.वानखडे,शिराळा शाखा कार्यालयाचे प्रमुख एन.आर.तिवारी,रूक्मिनीनगर शाखा कार्यालयाचे प्रमुख विशाल वानखडे आणि अंजनगाव शाखा कार्यालयाचे प्रमुख म्हणून एस.बी.गुजर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून कर्मचाऱ्यांनी वसुलीत ठेवलेल्या सातत्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतूक केले तर,ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाचे त्यांनी आभार मानले.यावेळी जिल्ह्यातील महावितरणचे उपविभागीय अभियंते,सहाय्यक अभियंते व वित्त व लेखा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: