Saturday, December 28, 2024
Homeराजकीयअल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती सुरू ठेवा - प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांना पुरोगामीचे...

अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती सुरू ठेवा – प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांना पुरोगामीचे निवेदन्…

नांदेड – महेंद्र गायकवाड

शासनाने राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या सत्रापासून बंद केली आहे ती पुनःश्च सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांना मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन देण्यात आले.

शिष्यवृत्ती बंद करताना प्राथमिक शिक्षण दिले जात आहे हे कारण सांगण्यात आले मात्र पुस्तके व अर्धवट विद्यार्थ्यांना गणवेश व्यतिरिक्त काहीच मोफत दिले जात नाही, पालकांनी आर्थिक अडचण असल्यामुळे आपल्या मुलांना शाळा बुडवून कामावर नेऊ नये अशी शिष्यवृत्ती देण्यामागील भावना होती तिचा मात्र आता विसर पडत चालला आहे.

इयत्ता 1 ली पासून अल्पसंख्याक, ओबीसी, एस.सी, एस.टी, अपंग, अस्वच्छ कामगार पालक, गुणवंत विद्यार्थी अश्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यापैकी इयत्ता 1 ते 8 मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या सत्रापासून शिष्यवृत्ती मिळणार नाही अशी सूचना शिष्यवृत्ती पोर्टल वर प्रकाशित झाली आहे त्याची तात्काळ दखल घेत पुरोगामी शिक्षक संघटनेने मंत्रालयात हा मुद्दा मांडला व शिष्यवृत्ती सुरू ठेवण्याची मागणी केली,

यावेळी त्यांनी ही शिष्यवृत्ती केंद्र शासनाच्या सहकार्याने सुरू होती त्यांनी त्यांचा वाटा बंद केल्यामुळे राज्य पूर्ण रक्कम देऊ शकणार नाही करिता बंद केली आहे अशी माहिती दिली सोबतच संघटनेची मागणी आम्ही केंद्र शासनाकडे पाठवू व पुढे होणाऱ्या केंद्र राज्य बैठकीत सुद्धा आपली मागणी मांडू असे आश्वासन दिले. यावेळी विभागाच्या उपसचिव आ.उ.पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

चर्चेच्या वेळी पुरोगामीचे प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, प्रदीप पवार रत्नागिरी, इरफान मिर्झा जिल्हाध्यक्ष वाशीम, प्रदीप गावंडे , किशोर आनंदवार, संजय चिडे चंद्रपूर हे पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती जी. एस. मंगनाळे राज्य उपाध्यक्ष यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: