Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeव्यापारसणासुदीच्या काळात ग्राहकांची सढळ हस्ते खरेदी: शॉपीफाय...

सणासुदीच्या काळात ग्राहकांची सढळ हस्ते खरेदी: शॉपीफाय…

७८ टक्के ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे ओढा

वाढती खर्चाची क्षमता तसेच जागतिक साथीनंतरच्या काळात आपल्या जीवनशैलीत सुधारणा करण्याची प्रेरणा यांच्यामुळे भारतीय ग्राहक मागील वर्षाच्या तुलनेत आपल्या सणांच्या खरेदीवर जास्त खर्च करण्यासाठी इच्छुक असल्याचे शॉपीफाय या भारताच्या सर्वांत मोठ्या आणि ख्यातनाम ब्रँड्सना अत्यावश्यक इंटरनेट सुविधा देणाऱ्या आघाडीच्या पुरवठादाराने प्रकाशित केलेल्या २०२२ चा फेस्टिव्ह शॉपिंग आऊटलुकमधून निदर्शनास आले आहे.

शॉपीफायने महानगर आणि बिगर महानगरी शहरांमधील १००० ग्राहकांचे सर्वेक्षण केले असून त्यातून ग्राहकांची सातत्याने बदलणारी वर्तणूक आणि जागतिक साथीनंतरच्या काळात सणांमध्ये खर्चाची पद्धत यांचा विचार केला गेला आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी जवळपास ८५.८२ टक्के ग्राहकांनी त्यांनी मागील वर्षी केलेल्या खरेदीच्या तुलनेत जास्त खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

इटेलर्सवरील विश्वास वाढला: यावर्षीही भारतीय रिटेल क्षेत्रात ऑफलाइनकडून ऑनलाइन खरेदीच्या दिशेने कल वाढताना दिसू लागला आहे. जवळपास ७८.५७ टक्के ग्राहक सणांच्या कालावधीत जागतिक साथीपूर्वी त्यांनी ऑनलाइन केलेल्या खरेदीच्या तुलनेत जास्त खरेदी करण्याचे नियोजन करत आहेत.

ग्राहकांच्या प्राधान्यात झालेला बदल हा ऑनलाइन खरेदीतून कुठूनही खरेदी करण्याची दिलेली सुलभता, भागीदारांच्या सवलती, खास डील्स, सुलभ पेमेंट पर्याय आणि वेगवान डिलिव्हरी यांच्यामुळे झालेला आहे. महानगरांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसोबतच बिगर महानगरी क्षेत्रांमधील ग्राहकही आपल्या सणांच्या खरेदीबाबत इ-टेलर्सवर जास्त विश्वास ठेवू लागले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन खरेदीला पसंती: ड्रायफ्रूट्स, मिठाई आणि चॉकलेट्स यांच्यासारख्या पारंपरिक फेस्टिव्ह भेटवस्तू ग्राहकांच्या पसंतीच्या ठरल्या असताना ग्राहकांचा भर इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्च्या खरेदीवरील भर वाढला असून त्यापाठोपाठ फॅशन आणि अॅक्सेसरीजवरही खर्च करू लागले आहेत.

जवळपास ८१.६५ टक्के ग्राहक फॅशन आणि अॅक्सेसरीज खरेदी करू इच्छितात तर त्यापाठोपाठ ७६.३७ टक्के लोक ड्रायफ्रूट्स, मिठाया आणि चॉकलेट्स तर ६८.५७ टक्के लोक घरगुती इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सवर खर्च करतात. हा बदल आधुनिक ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांचा निर्देशक आहे, ज्यांना सणांच्या डील्सकडे आपली जीवनशैली सुधारण्याची एक उत्तम संधी म्हणून पाहायचे आहे.

कॅशलेस पेमेंट्सचा वापर वाढला: भारत सरकार सुरक्षित पेमेंट गेटवे आणि सवलतींद्वारे लोकांना कॅशलेस पेमेंट्सना प्रोत्साहन देऊ लागले असताना यूपीआय, कार्डस् आणि इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल पेमेंटच्या पद्धती भारतीय ग्राहकांनी सर्वाधिक प्राधान्य दिलेले पर्याय ठरू लागल्या आहेत.

कॅशलेस पेमेंट्सची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन कॅश पेमेंट्स आता कमी प्रमाणात होऊ लागल्या आहेत. यूपीआय ही सर्वाधिक प्राधान्याची पेमेंट पद्धत ठरू लागली आहे. जवळपास ६७.३६ टक्के ग्राहक त्याचा पर्याय निवडत आहेत, त्यापाठोपाठ ४५.४९ टक्के क्रेडिट कार्डने पेमेंट करतात, ३७.६९ टक्के नेटबँकिंगने आणि ३८.६८ टक्के लोक रिवॉर्ड पॉइंट्ससाठी खरेदी करतात.

अत्यावश्यक वस्तूंना प्राधान्यः जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था मंदावली असताना तिचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि जागतिक साथीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता यांच्यामुळे भारतीय ग्राहक यावर्षी आपल्या खरेदीचे बजेट वाढवत असतानाही सावधगिरीने खरेदी करण्याचा पर्याय निवडत आहेत. सुमारे २५.७१ टक्के प्रतिसादक यावर्षी कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्याच्या तयारीत राहून ऐषारामी वस्तूंऐवजी अत्यावश्यक बाबींवर खर्च करण्याचा पर्याय निवडत आहेत.

सवलती आणि डील्सवर ग्राहकांचे लक्ष: ब्रँडच्या नावावर, उत्पादन श्रेणी आणि दर्जा यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या पारंपरिक विचारापासून पुढे जात ७५.८२ टक्के ग्राहकांनी एखादा ब्रँड किंवा विक्रेता यांच्याशी चिकटून राहण्यासाठी सवलती आणि डील्स यांना सर्वाधिक महत्त्व दिले आहे. अनेक ग्राहक त्यांच्या पैशांसाठी जास्तीत-जास्त मूल्य देणाऱ्या ब्रँड्स- विक्रेत्यांकडेच जाण्याचे नियोजन करत आहेत.

शॉपीफाय इंडियाच्या राष्ट्रीय प्रमुख आणि संचालक भारती बालकृष्णन म्हणाले, “डिजिटल शिफ्ट आता दिसून येत आहे आणि भारतीय ग्राहकांना खरेदीच्या पुढील पिढीकडे नेऊ लागले आहेत. दिवाळी २०२२ हा देशभरातील एक मोठा खरेदी उपक्रम ठरेल, कारण ग्राहक प्रचंड मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि ऑनलाइन खरेदीच्या सुलभतेचा पर्याय निवडतात.

अनेक ब्रँड्स जे मार्केटप्लेसच्या माध्यमातून ऑनलाइन सहभागी होत आहेत आणि त्यांच्या वेबसाइट्स आसपासच्या दुकानांमध्ये जाण्यापूर्वी ग्राहकांना ऑनलाइन ब्राऊझिंगची सवय लावत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आल्यामुळे ग्राहक आपण कुठे खर्च करतो याबाबत अधिक सावध आहेत. परंतु फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्यावश्यक वस्तू यांच्यावरील डील्स व सवलती आणि स्थानिक ब्रँड्सना मदत या सर्व बाबींना पाठबळ दिले जात आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: