Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीवीज वाहिन्यांशी सुरक्षित अंतर न ठेवता इमरातीचे बांधकाम धोक्याचेच...अपघात झाल्यास बांधकाम धारक...

वीज वाहिन्यांशी सुरक्षित अंतर न ठेवता इमरातीचे बांधकाम धोक्याचेच…अपघात झाल्यास बांधकाम धारक राहणार जबाबदार…

अमरावती – महावितरणच्या उच्चदाब व लघूदाब वाहिन्यांखाली घर बांधणे,तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या निकषानुसार वीज वाहिन्यापांसून सुरक्षीत अंतर न ठेवता केलेल्या इमारतीच्या बांधकामुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे भविष्यात असे अपघात होऊ नये याकरिता कायदेशीर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिने अमरावती परिमंडळातील वीज सुरक्षा नियमांचा भंग करून वीज वाहिनीखाली,जवळ केलेल्या बांधकाम धारकांना महावितरणकडून नोटीसा देण्याचे निर्देश मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी अधिक्षक अभियंता अमरावती व यवतमाळ यांना दिले आहे.

विजेमुळे होणाऱ्या प्राणांतिक आणि अप्राणांतिक अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणकडून उपाय योजना राबविण्यात येतात. याचाच भाग म्हणून महावितरणकडून बांधकाम धारकास नोटीसा देण्यात येणार आहे. विधी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या नोटीसाव्दारे कायदा आणि सुरक्षेबाबत माहिती देऊनही जे बांधकाम धारक नियमांचे पालन करणार नाही ,ते त्याठिकाणी होणाऱ्या जिवित व वित्त हानीस सर्वस्वी जबाबदार राहणार आहे.

केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधिचे उपाय) विनिमय २०१० नुसार वीज वाहिनीखाली बांधकाम करू नये,तसेच उच्चदाब वाहिनीचे इमारतीपासून उभे व आडवे अंतर अनुक्रमे ३.७ मीटर व १.२ मीटर असणे आवश्यक आहे.तसेच लघुदाब वाहिनीचे इमारतीपासूनचे उभे व आडवे अंतर अनुक्रमे २.५ मीटर व १.२ मीटर असणे आवश्यक आहे. वीजेपुढे चूकीला क्षमा नाही.

महावितरणकडून अपघाताबाबत काळजी घेतल्या जात असली तरी ,काही नियंत्रणाबाहेरील घटनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बांधकामधारकांनी सुरक्षेची काळजी घेत बांधकाम करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी महावितरण, अमरावती परिमंडळ

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: