Friday, September 20, 2024
Homeराज्यअरविंद बाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथे संविधान दिवस साजरा...

अरविंद बाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथे संविधान दिवस साजरा…

अतुल दंढारे – नरखेड

नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथील अरविंद बाबू देशमुख महाविद्यालय येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ला राष्ट्रीय सेवा योजना याच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला तसेच सामूहिक संविधान वाचन करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश पवार हे होते सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व महाविद्यालयीन विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग यांच्या वतीने संयुक्तपणे संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले.

नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच भारतीय संविधानाने भारतीयांना एक स्वतःचं अस्तित्व कसे निर्माण करता येईल यावर विचार प्रगट केले .
कार्यक्रमाला रासेओ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ अमित गद्रे, ग्रंथपाल प्रा प्रवीण वसू , राज्यशास्त्र विभागप्रमख प्रा राजेंद्र घोरपडे , जावळे सर, वासाडे सर, बालपांडे सर व महाविद्यालयीन इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: