अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानल्या जातो कारण या मतदार संघात सलग सहावेळा लालाजी उर्फ गोवर्धन शर्मा हे निवडून आलेत. या मतदार संघात हिंदी भाषिकांची संख्या बर्याच प्रमाणात असली तरी येथे मराठी भाषिकांची मते देखील निर्णायक आहेत. त्यामुळे हिंदी भाषिकांनाच येथून उमेदवारी मिळेल असे नाही. लालाजी याचं या मतदार संघात मोठे वर्चस्व होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हा बालेकिल्यात कोणाला संधी मिळणार?…तर भाजप या मतदार संघात लालाजी यांचे सुपुत्र कृष्णा शर्मा यांना संधी देणार असल्याचे बोलले जाते मात्र भाजपचे बरीच मंडळी या मतदार संघावर डोळा ठेवून असल्याने वेळेवर कोणाला उमेदवारी मिळणार हे सांगता येणार नाही. सोबतच मागील निवडणुकीत दुसर्या स्थानावर असलेला कॉंग्रेस पक्षही या मतदार संघात आपला तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत तर सूत्राच्या माहितीप्रमाणे या मतदार संघात कॉंग्रेस मराठा कार्ड वापरणार असल्याचे बोलले जाते. कॉंग्रेस तर्फे इच्छुकांची यादीही फार मोठी नाही तीन चार मराठा उमेदवार यामध्ये इच्छुक असल्याचे बोलले जाते तर महाविकास आघाडी तर्फे रमाकांत खेतान, साजिद खान, डॉ. जीशान हुसेन, विवेक पारसकर, अन्नपुर्णेश पाटील, राजेश मिश्रा, मदन भरगड आदींची नावे चर्चेत आहेत. यापैकी अन्नपुर्णेश पाटील या नावाची चर्चा सध्या काँग्रेस पक्षाच्या गोठ्यात असल्याचे बोलल्या जाते.
या मतदारसंघात मराठा व्यतिरिक्त हिन्दी भाषिक सुद्धा इच्छुक आहेत मात्र यावेळेस कॉंग्रेस मराठा समाजातील निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असल्याचे बोलले जाते. मागील वेळी भाजपला चांगलीच तगडी फाईट देणारे कॉंग्रसचे साजिद खान पठाण यांना संधी देणार का नाही हे आताच सांगता येणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची एक audio क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांची बरीच बदनामी झाली होती. याचाच फायदा घेत कॉंग्रस तर्फे अनेक चेहरे मैदानात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत अभय पाटील यांना चांगलीच लीड मिळाल्याने विधानसभेसाठी कॉंग्रेस सज्ज असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघातभाजपातील अनेक पदाधिकारी आणि नेते मंडळींना हा मतदार संघ सुरक्षित आणि सहज वाटत असला तरी यावेळी भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसही तयार आहे.