दानापुर : गोपाल विरघट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आझादी का अमृत महोत्सव तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
भारताला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यात 9 आगस्ट ते 15 आगस्ट या कालावधीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या अनुषंगाने दानापूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली .यावेळी सर्वप्रथम दानापूर येथिल दिवंगत जिल्हा परिषद सदस्य स्व.विजयकुमार ढाकरे यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. गावातील मुख्य मार्गाने ही पदयात्रा मार्गस्त होत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिद्धार्थ नगर या मुख्य मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. हि पदयात्रा दानापुर येथुन सौदळा,हिवरखेड मार्गस्थ झाली.
यावेळी अकोला जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष अशोक अमानकर, महाराष्ट्र प्रदेश चे संघटक अँड. महेशदादा गणगणे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रमुख डॉ, संजीवनीताई बिहाडे ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॉ.अशोक बिहाडे ,जि.प.सदस्य गजानन काकड, श्यामशिल भोपळे, सोयब अली मिरसाहेब, तालुका अध्यक्ष अफरोज पठाण,प्रकाश वाकोडे,अशोक घाटे,गजानन मुंगसे,डॉ.नबी, गजानन वानखडे,सतिश इंगळे,राऊत गुरुजी, संतोष पिंजरकार,बबलू वैलकर, समिर सौदागर, बंडु वैलकर, मनोज नेरकर, गणेश घायल,नंदकिशोर नागपुरे,योगेश अटराळे,शे.अकलिम,फारुख खान,हरिश्चंद्र अरबट,विनोद कोकाटे,अशोक कोकाटे,बाबुभाई,अनंता शित्रे,यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.