डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ मुकुल वासनिक यांची पातूर येथे जंगी प्रचार सभा संपन्न…
अकोला – मोदी सरकारने देशाला कंगाल करण्याचे षडयंत्र आखले असून अनेक प्रकारच्या माध्यमातून देशाला कंगाल बनवण्याचे कारस्थान मोदी सरकार करीत आहे. गेल्या दहा वर्षात देशातील महागाई, भ्रष्टाचाराने जगात भारताची नाचक्की झाली असून जनता त्रासून गेली आहे.
आता ताज्या दमाच्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला दिल्लीच्या सत्तेची चावी देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय काशिनाथ पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अ भा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,माजी केंद्रीय मंत्री, खा मुकुल वासनिक यांनी केले.
खासदार वासनिक यांची शनिवारी पातूर येथे झंजावाती प्रचार सभा संपन्न झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवीत डॉ अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आ लक्ष्मणराव तायडे, माजी आ नातीकुद्दीन खतीब,माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ नितीन देशमुख, अ भा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आशीष दुवा, प्रदेश नेते नाना गावंडे,प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रकाश तायडे, प्रभाताई ठाकरे,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,सय्यद मुजाहिद, बंटी गहलोत, विजय अंभोरे,श्याम उमाळकर, सचिन मुरतडकर,लुकमान ठेकेदार,प्रमोद डोंगरे,हाजी सै बुर्हानु,सै कमरुद्दीन, हिदायत खान,मुख्तार शेख अहमद,महेंद्र गवई आदी यावेळी उपस्थित होते. खा वासनिक यांनी यावेळी मोदी सरकारच्या बेबंदशाहीवर धणाघाती हल्ले केले.
400 पारचे आकडे दाखवत असताना दुसरीकडे मोदी सरकारचा स्पेशल पराभव दिसत असत आहे.गर्दी ओस होत आहे.यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे धाबे सर्वत्र दणाणले असल्याचे वासनिक यांनी यावेळी सांगितले.
या दहा वर्षात राष्ट्रीय प्रगती सातत्याने खुंटली असून अराजकता निर्माण होत आहे. याच्यावर काँग्रेस प्रणेत इंडिया आघाडी हाच एक पर्याय असून अकोला लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सभेत शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,आ नितीन देशमुख, सै कमरुद्दीन, शिवाजीराव मोघे यांनी ही डॉ अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.प्रास्तविक प्रकाश तायडे यांनी,संचालन मुख्तार शेख यांनी तर आभार चंद्रकांत बारताशे यांनी मानलेत. यावेळी राजेश ठाकरे, निरंजन बंड, रुस्तम शाह, गुड्डू पैलवान, राजेश गावंडे समवेत पातुर बाळापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,आम आदमी पार्टी, भीमशक्ती आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.