Monday, December 23, 2024
Homeराज्यकाँग्रेस अनुसूचित जाती विभाग मयत अक्षय भालेराव कुटुंबियांच्या सदैव पाठीशी - प्रदेशाध्यक्ष...

काँग्रेस अनुसूचित जाती विभाग मयत अक्षय भालेराव कुटुंबियांच्या सदैव पाठीशी – प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे…

भालेराव कुटुंबीयांना केली रोख दीड लाख रुपयाची मदत

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथे अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी असून निषेधार्ह बाब आहे सदरचा खून खटला हा फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यासह प्रकरणातील दोषीविरुद्ध कडक शासन व्हावे शासनाने सदर कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे ही आपली प्रमुख मागणी,

असून भालेराव कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्रातील काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग खंबीरपणे उभा राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांनी बोंढार येथे अक्षय भालेराव कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीदरम्यान बोलताना म्हण्टले आहे.

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यासह बोंढार येथे अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत अक्षय भालेराव यांच्या मातोश्री व बंधू यांच्याकडे रोख दीड लाख रुपयाची मदत त्यांनी आपल्या भेटीदरम्यान दिली.

यावेळी काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम, प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल सावंत ,काँग्रेस अनु.जाती विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार ,श्रीमती अनिताताई इंगोले,नगरसेवक सोनाजीराव सरोदे,सुभाष काटकांबळे ,संजय कोलते, महेंद्र गायकवाड , संजीव कुमार गायकवाड ,गंगाधर सोनकांबळे ,प्रवीण वाघमारे, जिल्हा संघटक,

दिगंबर गायकवाड ,उमरी तालुका अध्यक्ष दिनकर भंडारे, बिलोली माधव वाघमारे, लोहा तालुका मधुकर डाकोरे, नायगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय आईलवर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष संतोष आंबेकर, जिल्हा सचिव राहुल लोखंडे,जिल्हा सचिव पंडित वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष रामराव सोनसळे,

भी.ना.गायकवाड भीम शाहीर आनंद कीर्तने,किशनराव रावणगावकर,संजय वाघमारे, अरविंद सरपाते, आनंदराव सावंत, कसले ,आनंद कर्णे,अनिल सरपे दिगंबर माने, दिपक पावले ,बाळू राऊत, अँड. सुनील नागोरे, राष्ट्रपाल खंदारे, सचिन धुतुरे, संजय कांबळे ,आकाश कदम, प्रवीण वाघमारे,

कुणाल लोखंडे, कामाजी आटकोरे, नितीन वाठोरे ,अमित गिमेकर ,विकी गायकवाड, उबेद शेख ,राहुल मोरे ,गौतम सोनकांबळे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: