रामटेक – राजु कापसे
तालुक्यात आदिवासीबहुल भागातील तीन ग्रामपंचायत मध्ये दिनांक 16 ऑक्टोंबर ला निवडणूक झाली. त्यामध्ये टांगला चिकनापूर तसेच पुसदा पुनर्वसन १ व पुसदा पुनर्वसन २ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दरम्यान आज 17 ऑक्टोबरला मतमोजणी झाली असता त्यामध्ये टांगला चिकनापूर येथे काँग्रेस पक्षाचा सरपंच आरूढ झाला तर पुसदा पुनर्वसन १ व पुसदा पुनर्वसन २ येथील निवडणूक ही बिनविरोध झाली. निवडुन आलेल्या सरपंच, सदस्यांमध्ये टांगला चिकनापुर ग्रामपंचायतमध्ये अनुसुचित जमातीतील पंचफुला वासुदेव मडावी या काँग्रेस पक्षातुन सरपंच म्हणून निवडून आल्या. तर सदस्य पदाकरिता सुधाकर मडावी, प्रियंका बोपटे , सचिन तांडेकर, सीमा उईके , शालू वरकडे, गणेश कोवाचे, सुनिता वरकडे हे निवडुन आलेले आहेत.
त्याचप्रमाणे पुसदा पुनर्वसन १ मध्ये सरपंच पदासाठी थेट मंगला बळवंत मेश्राम तसेच सदस्य पदाकरिता विनायक कुळसाम , निशा मरकाम , सुभाष गोळंगे , सारिका कोकोडे , विद्या चिंचोळकर , गणेश मेश्राम , ललिता मरकाम तर पुसदा पुनर्वसन २ मध्ये सरपंच पदासाठी बिनविरोध मेघा प्रदीप कोडवते तसेच सदस्य पदाकरिता मुकेश राऊत , बबीता टेकाम , पौर्णिमा मडावी , पुष्पलता राऊत , ईश्वर सलामे , गीता उईके हे निवडुन आलेले आहेत.