Sunday, December 22, 2024
Homeराज्यलोकांच्या मदतीसाठी राजेंद्र मुळक यांच्या हस्ते काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन...

लोकांच्या मदतीसाठी राजेंद्र मुळक यांच्या हस्ते काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन…

रामटेक – राजु कापसे

आज दि.29/8/2023 रोज मंगळवरला रामटेक तालुका अंतर्गत देवलापार येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मा.श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते करण्यात आले.

90% समाजकारण आणि 10% राजकारण हा उद्देश घेऊन उघडण्यात आलेल्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्या सुख-दुःखात सामील होता येईल तसेच त्यांना येणाऱ्या समस्या आणि अडचणींवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करता येईल.

सोबतच राजेंद्र मुळक रुग्ण सहायता कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना नेहमीच मदत करण्यात येते. या नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संबंधीत तालुक्यातील गरजू रुग्णांपर्यंत थेट पोहोचने शक्य होईल. याच संकल्पनेतून या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी श्रीमती शांताताई कुंभरे (सदस्या, जि. प. नागपूर), श्री. कैलासजी राउत (अध्यक्ष रामटेक तालुका काँग्रेस कमिटी), श्री. दयारामजी भोयर (अध्यक्ष पारशिवणी तालुका काँग्रेस कमिटी), श्री. रविंद्रजी कुंभरे (सदस्य प. स.रामटेक), श्रीमती साबेरा ताई पठाण (संचालिका कृ. उ. बा.स. रामटेक), श्री. दामोधरजी धोपटे (अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी),

श्री. पंचमजी चौधरी (माजी सदस्य प. स. रामटेक), श्री. महेशजी मडावी (माजी सदस्य प. स. रामटेक), सौ. सारीकाताई उईके (सरपंच, ग्रा. प. देवलापार), कु. किर्तीताई आहाके (सरपंच, ग्रा. प. वरघाट), श्री. उमेशजी भंडारकर (सरपंच, ग्रा. प. बेलदा), श्री. राजेशजी भोंडेकर (सरपंच, ग्रा. प. सालई),

श्रीमती शहीस्ता ताई पठाण (माजी सरपंच, ग्रा. प. देवलापार), सौ. आम्रपाली ताई भिवगडे, श्री. मनोजजी जयस्वाल, श्री. कैलासजी निघोट, श्री. हरीशजी गुप्ता, श्री. शरदजी गुप्ता, श्री. राजूजी आगरे, श्री. रावसाहेब झटाळे, श्री. तुळशीरामजी खंडाते, श्री. राजेन्द्रजी बागडे, श्री. मुकेशजी पेंदाम, श्री. सुधाकरजी मडावी, श्री. स्वप्नीलजी सरयाम,

सौ. शिल्पाताई पेंदाम, कु. मोनिकाताई पोहरे, श्री. मोइमजी पठाण, श्री. आकाशजी पांधरे, श्री. दिपकजी टिकापाचे, श्री. जनार्धनजी कोवाचे, सौ. वंदनाताई राऊत, श्री. मुरलीजी केळवदे, श्री. बाबुलालजी उईके, श्री. विक्कीजी सिंद्राम, श्री. मोहितजी बमचार, श्री. प्रवीणजी ऊईके, श्री. संतलालजी उईके इत्यादी कार्यकर्ते तथा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: