अहेरी – मिलिंद खोंड
30 जून पासून जिल्ह्यातील शालेय मान्सून सत्र सुरु झाले आहे. भाजप सरकार बेटी बचाव – बेटी पढाव च्या गोष्टी करतात मात्र त्याच मुलींना चांगले शिक्षण द्यायचे झाल्यास भाजप काढता पाय घेते. सुरजागड खदाणीत चालणाऱ्या जड वाहतुकीमुळे आष्टी आलापल्ली महामार्गाची दुरावस्था झाली असल्याने सदर महामार्गवरील महाराष्ट्र शासनाच्या ST बसेस पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे बस ने प्रवास करणाऱ्या विद्यार्त्यांना आणि रस्त्याच्या दुरावस्तेमुळे सायकल ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांणा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थयांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे.
जिल्हात शिक्षणाचा स्तर वाढावा आणि जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा म्हणून काँग्रेस शासनाच्या काळात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. याच विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरिता देशाच्या महामाहीम राष्ट्रपती महोदय जिल्ह्यात येत आहे.
या दौऱ्याकरिता राज्य शासन आणि प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. एकीकडे काँग्रेस काळात जिल्ह्यात शिक्षणाची गंगा वाहू लागली मात्र भाजप च्या काळात विद्यार्थी बस च्या प्रतीक्षेत असल्याने संतप्त गावकरी, विद्यार्थी आणि अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सुभाषनगर येते रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुध्यक्ष डॉ. निसार (पप्पू) हकीम, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रजाक पठाण, उपाध्यक्ष राघोबा गौरकर, आदिवासी सेल, अशोक आईंचवार तालुकाध्यक्ष ग्राहक संरक्षण सेल, तालुकाध्यक्ष मधुकर शेडमेक, किसान सेल तालुकाध्यक्ष नामदेव आत्राम,
अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हनिफ शेख, गणेश उप्पलवार, रुपेश बंदेला, दिनकर हुलके, देशमुख, पोरेडीवार, बेबीताई कुत्तरमारे, सह शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, पालक, महिला आणि काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
अहेरीचे तहसीलदार फारुख शेख, पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी आंदोलस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या व सोमवार पासून नियमित बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले. सोमवार पर्यंत मागण्या पूर्ण ण झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देत तात्पुरता आंदोलन मागे घेण्यात आले.