Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | मौदा वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कांग्रेस चे उपविभागिय अधिकार्‍यांना निवेदन...

रामटेक | मौदा वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कांग्रेस चे उपविभागिय अधिकार्‍यांना निवेदन…

रामटेक – राजू कापसे

रामटेक – मौदा या मुख्य मार्गावरती सूर्य लक्ष्मी कॉटन मिल, चक्रधर राईस मिल, ओम राईस मिल आणि सोना फूड इंडस्ट्रीज तसेच इतर मोठं -मोठे इंडस्ट्रीज या मौदा-रामटेक रोड वरती आहेत परंतु रामटेक-मौदा रोड हा अरुंद मार्ग असून रोडवर ठीक ठिकाणी गड्डे पडलेले आहे.

या मार्गावर चक्रधर राईस मिल, ओम राईस मिल,सूर्यलक्ष्मी कॉटन मिल जवळ व सोना फूड इंडस्ट्रीज या कंपनीजवळ मोठ्या प्रमाणामध्ये जडवाहतुकीचा ट्रकच्या रांगा नेहमी लागलेल्या असतात.त्यामुळे या मुख्य मार्गावर वाहतूक करत असताना अनेक वाहनांना अडचण निर्माण होत असते.

उदाहरणार्थ बस,बाईक,कार ट्रक इत्यादी वाहने या मुख्यमार्गावरून जाणे येणे करत असतात.परंतु या उभ्या असलेल्या ट्रकच्या रांगेमुळे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहेत. या खासगी कंपन्यांनी स्वतःची कोणत्याही प्रकारे पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हे ट्रक नेहमी या रोडच्या बाजूला उभे असतात.

या उभ्या असलेल्या ट्रकांमुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झालेले आहेत. अनेक लोक मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत व काही लोकांना अपंगत्व सुद्धा आलेला आहे. करिता माझी शासनाला विनंती राहील की अशा या गैरजिम्मेदार कंपन्यांवरती योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. आणि त्वरित या उभ्या असलेल्या ट्रकाना मुख्य मार्गावरून हटवण्यात यावे.

अन्यथा तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीच्या वतीने या कंपन्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी माजी सरपंच महेश कलारे, माजी उपसरपंच मनोज नौकरकार,रामटेक शहर अध्यक्ष दामोधरजी धोपटे,

तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती अध्यक्ष नरेंद्र सहारे,पं.स.सदस्य अस्मिताताई बिरणवार ,उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार ,सदस्य योगेश निनावे ,आश्विन साहारे, अभिषेक डहारे, सुरेंद्र मदनकर, अश्विन सव्वालाखे, मनोहर नागपुरे, राष्ट्रपाल पडोळे, मुकेश मल्लेवर, मुन्ना बिरनवार, प्रकाश मोहोड,बंडू वानी,उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: