महेंद्र गायकवाड
नांदेड
जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे शेती, शेतकरी, नागरिक व पायाभूत सोयीसुविधांचे प्रचंड नुकसान झाले असल्यानंतरही अतिवृष्टी व पुराचे बाधित क्षेत्र कमी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. केवळ नदी-नाल्यांच्या काठावरील शेतींचे सर्वेक्षण झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे.
प्रशासनाने सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे झाल्याचे सुनिश्चित करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी अशी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर असताना रविवारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर,माजी मंत्री डी.पी.सावंत,आ. मोहन हंबर्डे ,काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सौ.मीनलताई खतगावकर हे उपस्थित होते.