भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार काँग्रेस उमेदवार संतोष रावत आमने सामने..?
चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
निवडणुकी दरम्यान प्रोटोकाल पाडत एकमेकांचा आदर करत निवडणुकीला समोरे जाण्याची परंपरा लाभलेल्या चंद्रपूर जिल्यात यावेळी एका शुल्लक घटनेने गालबोट लागले आहे….
बल्लारपूर विधानसभेसाठी भाजप व महायुतीकडून उभे असलेले राज्याचे वजनदार नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार तोफा थंडावल्या नंतर मूल तालुक्यातील येरगाव येथे रात्री १० वाजता नंतर सभा घेऊन निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
या सभेमध्ये मुनगंटीवार बोलतानाचा व्हिडीओ सर्वत्र वेगाने वायरल होत असून या बेकायदेशीर सभेला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुंडांकडून मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यांच्या या गंभीर प्रकाराची दखल घेण्याचे धाडस कोणी करू शकेल का? असा सवाल काँग्रेसच्य्या वतीने उपस्थित केला जात आहे.
लोकसभेमध्ये 2 लाख 65 हजार मतांच्या लीड ने झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेतील पराभवाची कल्पना सहन होत नसल्याने अक्षरशः कायदाच पायदळी तुडवत आचार संहितेचा भंग केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तर सभे दरम्यान काँग्रेस कार्यकर्यांनी मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चोप दिल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
एकंदरीत प्रचाराची वेळ संपल्या नंतर उमेदवार म्हणून मुनगंटीवार यांनी कायदा पायदळी तुडवत सभा घेणे चुकीचे की,त्यां बेकायदेशीर सभेला विरोध करणारे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत आणी त्यांचे कार्यकर्ते चुकीचे यांचे उत्तर मतदार उद्या मतदानातून देणार असून,या एकंदरीत प्रकाराने मूल पोलिसांचे टेन्शन वाढले आहे…
प्रसार माध्यमातील व्हिडिओमध्ये मुनगंटीवार हे येरगाव येथील सभेत उपस्थितांशी बोलत आहेत. ‘येरगाव येता आलं नाही, पण मी शब्द दिला होता. त्यादिवशी जरी येता आलं नसलं तरीसुद्धा मी १८ तारखेला रात्री निश्चित येईन. साधारणतः रात्री ९-१० वाजता येईन असं होतं, पण उशीर झाला.” असं स्पष्टपणे बोलत असल्याचे चित्रण झालेले आहे.
मुनगंटीवार यांनी आचार संहितेचा भंग करत २० तारखेला मला निवडून द्या’ असे आवाहन करून उपस्थितांना अनेक आश्वासने दिल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे चित्रित झालेले आहे.
या गंभीर कृत्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्यांची उमेदवारी रद्द करावी. अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी केली आहे.तर मुनगंटीवार यांना धक्का बुक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या गुंडांवर कार्यवाही व्हावी,अशी भाजपची मागणी आहे.