रामटेक – राजु कापसे
रामटेक पंचायत समितीचे सभापती पद हे जात पडताळणी पत्र सादर नाही केल्यामुळे तत्कालीन सभापती ला अपात्र ठरवण्यात आले होते.त्यामुळे रामटेक पंचायत समितीचे सभापती पद रिक्त झाले.
त्यामुळे उपसभापती श्री.नरेंद्र बंधाटे यांचा कडे सभापती पदाची प्रभारी जवाबदारी देण्यात आली.रामटेक पंचायत समिती येथे प्रथमच भाजपचे सभापती झाल्यामुळे नागपूर येथील उपमुख्यमंत्री यांचे शासकीय निवास स्थान देवगिरी येथे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त सभापती श्री.नरेंद्र बंधाटे यांचा सत्कार करण्यात आला.
देवगिरी येथे रामटेक विधानसभेचे माजी आमदार श्री.मल्लिकार्जून रेड्डी,भाजप कार्यकर्ते विनोद कोहळे उपस्थित होते.