Sunday, December 22, 2024
Homeराज्यआपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन...

आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन…

आपत्ती व्यवस्थापनासाठी सावित्रीबाई फुले विद्यालयाचा पुढाकार…

विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

पातूर – निशांत गवई

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर तसेच मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनसमुदाय आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम दि.3 ऑक्टोबर 2022 ला सिदाजी महाराज मंदिर सभागृह पातुर येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर पातुरचे तहसीलचे तहसीलदार दीपक बाजड गटविकास अधिकारी उल्हास मोकळकर गटशिक्षणाधिकारी उल्हास घुले यांची उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजरचे पथक प्रमुख दीपकभाऊ सदाफळे यांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे समाजावर दूरगामी परिणाम होतात त्यापासून होणारे नुकसान रोखायचे असल्यास आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असते धोक्यांना आपण रोखू शकत नाही परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे होणारे हानिकारक परिणाम आपण कमी करू शकतो असे प्रतिपादन करून आपत्ती यायच्या आधी व आपत्ती आल्यानंतर आपण काय उपाययोजना करू शकतो त्यासाठी आपत्तीवेळी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह शिक्षक सचिन अरबाड व विद्यार्थी यांच्यासह चित्त थरारक प्रात्यक्षिक करून दाखवली व साहित्याची ओळख विद्यार्थी,पालक व गावातील नागरिकांना करून दिली. यावेळी या सुवर्णसंधीचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

प्रात्यक्षिका वेळी नगर परिषद अग्निशमन विभाग प्रमुख महेश राठोड,वाहन चालक सय्यद अशपाक यांनी अग्निशमन दलातील वाहन वापरल्यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली होती. यावेळी विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाळे संस्थेचे संचालक प्रल्हाद निलखन, पांडुरंग अरबाड, पत्रकार उमेश देशमुख मोहन जोशी,प्रदीप काळपांडे, संगीता इंगळे, डॉक्टर नवीनचंद्र देवकर प्राध्यापक भास्कर काळे,एनडीआरएफचे जवान रवी हिरळकर मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्ष सपनाताई म्हैसणे सचिव सचिन ढोणे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे पथक प्रमुख दीपकभाऊ सदाफळे, व त्यांचे सहकारी ऋषिकेश राखोंडे,मयूर सळेदार,शुभम वानखडे,अंकुश सदाफळे, शुभम जवके,ऋषिकेश तायडे यांचा शाल श्रीफळ व आभार पत्र देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाचे संयोजक श्रीकृष्ण शेगोकार यांनी तयार केली होती. तर सूत्रसंचालन सचिन अरबाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तर सिदाजी महाराज यात्रा पंचमंडळ, पातूर यांनी कार्यक्रमाला मंदिर सभागृह उपलब्ध करून देऊन सहकार्य केले.

माणसाच्या आयुष्यात कधी कोणती आपत्ती येईल ते सांगता येत नाही त्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण खूप महत्त्वाचे असते शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना असे प्रशिक्षण देणे म्हणजे समाजात जबाबदार नागरिक निर्माण करणेच आहे.

डॉ. सुचिता पाटेकर (जिल्हा शिक्षणाधिकारी अकोला )

दैनंदिन जीवन जगताना छोटे-मोठे अपघात नियमित होतात परंतु अपघात किंवा आपत्तींना सामोरे जाण्याच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना माहीत नसतात त्यामुळे आर्थिक व जीवित हानी होते ते टाळण्यासाठी ह्या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

सौ.सपनाताई प्रशांत म्हैसणे
(अध्यक्षा सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: