नरखेड – प्राथमिक आरोग्य केंद्र भिष्नुर येथे कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन मा. नीलिमाताई रेवतकर माजी सभापती नरखेड यांनी केले तर खरसोली येथील सरपंचा मा. निलमताई अरसडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. श्रीमती अर्चना सोरते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. उमेश देशमुख वैद्यकिय अधिकारी भिष्नुर यांनी लाभार्थ्यांना मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग होण्याची संभाव्य कारणे, त्यांची लक्षणे, करावयाच्या तपासण्या व भविष्यातील संभाव्य धोके याबद्दल महिती दिली, यावेळी डॉ. वैष्णवी बाभरे, डॉ. दिक्षा मडावी, श्रीमती सविता लिहितकर यांनी 65 लाभार्थ्यांची तपासणी केली त्यापैकी 5 लाभार्थ्यांना कर्करोगाची लक्षणे दिसून आलीत त्यांना पुढील तपासणी व उपचाराकरिता नागपुर येथे संदर्भित करण्यात आले.
यावेळी डॉ विशाल यादव, डॉ भावेश डांगोरे, श्रीमती राउत, श्री मोवाडे, टिक्कस, श्री. अजय रंगारी श्रीमती आघावं, खेडकर, खंडाते, श्री कौशल, बंड, लव्हाळे, वानखेडे , हिम्मत वंजारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन श्रीमती गजभिये यांनी केले तर श्री आशिष बावने यांनी आभार प्रदर्शन केले, शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ अक्षय निंबुरकर, डॉ. कृतीका, डॉ. पूजा, डॉ. सुरभी, नेहाल, राहुल, ललित, सिद्धार्थ, नितेश, श्रीमती रंजना, संगीता, किरणताई, वनिताताई यांनी परिश्रम घेतले.