मुंबई – गणेश तळेकर
दिनांक : २९ – ८ -२०२४ रोजी ,संध्याकाळी ७ वाजता , स्थळ : श्री शिवाजी नाटयमंदिर , पश्चिम, दादर, तिकीटमूल्य फक्त: १०० /- आहे , येथे या नृत्यनाटिकेसाठी आपले मनापासून सस्नेह आमंत्रित करित आहे. थोडेसे या नृत्यशैली बद्दल सांगेन…कै. उदय शंकर ज्यांना भारताचे नृत्याचे जनक मानले जाते तसेच त्यांचा १९४७ मध्ये भारताचा पहिला नृत्यावर आधारित चित्रपट “कल्पना” (ब्लॅक अँड व्हाईट )मध्ये प्रदर्शित झाला होता त्याच नृत्यशैलीला अनुसरून “वर्तुलम” सादर करित आहे.
उदय शंकर जी नंतर ही शैली त्यांचे शिष्य कै. सचिन शंकर आणि त्या नंतर त्यांचे शिष्य कै.सुबल सरकार यांनी जपली. सचिन शंकर यांनी महाराष्ट्रात अनेको सुंदर नृत्यनाटिका ज्याला इंडियन बॅले म्हंटले जात असे, सादर केल्या होत्या. इथे माझे बाबा यांनी सांगितलेली एक छोटीशी आठवण सांगते.
जेव्हा सचिन शंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिल्यांदा बॅले बसवला होता तेव्हा कै. आचार्य अत्रे खास पहिल्या रांगेत बसून कोण तो बंगाली माणूस आमच्या शिवाजी महाराज यांना नाचवतोय,जरा ही काही वेडवाकडं झालं तर याद राखा म्हणून खास आले होते मात्र प्रयोग झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या वर्तमान पत्रात आज खऱ्या अर्थाने आम्हांला आपले महाराज कळले असा ठळक मथळा होता. सचिन शंकर यांचे “कथा ही राम जानकीची” बॅलेही खूप गाजला होता.त्यात बाबूजी कै. सुधीर फडके यांचे गायन होते.
माझ्या लहानपणापासुन सचिन शंकर यांच्या कारकिर्दीतले खूप सुंदर सुंदर बॅले पाहण्याचे भाग्य मला लाभले. त्याकाळात मीडियाचे व्हिडिओ ई. किंवा आजच्या काळात सारखी प्रसार माध्यमे नव्हती. जी काही नृत्यशैली पाहिली ती माझ्या आठवणीप्रमाणे या बॅलेमधुन सादर करतेय.
“माणसाचा जन्म ते अंत ” हा एक कालचक्र असतो व आपण सर्वजण आयुष्याचं हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर आलेले असतो , ही संकल्पना घेऊन हा बॅले सादर करित आहे.आपण अवश्य यावे ही विनंती… लेखन – सुचरिता ,संगीत – संदेश हाटे , गायन – पंडित श्री . अजय पोहनकर / पंडित श्री वेणूगोपाल पिल्ले , प्रकाश योजना – कार्तिक पाल , वेशभूषा – स्मिता – शक्ती , निर्मिती व्यवस्था – शशांक बामनोलकर , प्रसिद्धी प्रमुख – गणेश तळेकर ,सादरकर्ते कलाकार – संतोष जाधव ,नितिन कांबळे ,सोबत “नृत्यालिका ” चे २० यशस्वी…!