Sunday, December 22, 2024
Homeराज्यवाहीटोला येथील सर्व्हिस रोड, नाली बांधकाम आणि वीज व्यवस्थेची अर्धवट कामे पूर्ण...

वाहीटोला येथील सर्व्हिस रोड, नाली बांधकाम आणि वीज व्यवस्थेची अर्धवट कामे पूर्ण करा : सरपंच रणवीर यादव…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्राम पंचायत येथील वाहिटोला येथील राष्ट्रीय महामार्ग – ७५३ मनसर-रामटेक-तुमसर या मार्गावरील सर्व्हिस रोड, नाली व वीज पुरवठा करण्याचे काम सध्या रखडले आहे. वरील कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी खैरी-बिजेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच रणवीर यादव यांनी केली आहे.

या संदर्भात रणवीर यादव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूरचे अधीक्षक अभियंता आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूरचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनही दिले. यादव यांनी पत्रात सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग ७५३ मनसर-रामटेक-तुमसर रस्त्याचे काम बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात आले.

सदर कंपनीने सदर महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायत खैरी-बिजेवाडा येथील वाहिटोला येथील सर्व्हिस रोड, नाली बांधकाम व वीज व्यवस्थेचे काम अपूर्ण सोडले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच वाहिटोला रेल्वे क्रॉसिंगच्या पूर्वेला ५०० मीटर आणि पश्चिमेला ५०० मीटर अंतरावर सर्व्हिस रोड, डिव्हायडर आणि विजेची व्यवस्था केलेली नाही.

तसेच रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता कायम आहे. येथे आतापर्यंत दोन जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. करारानुसार, बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेडने या मार्गाची विद्युत यंत्रणा चार वर्षे सुरळीतपणे चालवायची आहे. त्यानंतर ते स्थानिक प्रशासनाकडे वर्ग केले जाते.

असे असतांनाही वीजबिल वाचवण्यासाठी कंपनी रात्री बारा वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत दिवे बंद ठेवते किंवा अर्ध्या खांबावरच दिवे चालू ठेवते. त्यामुळे अंधारात मोठा वाहन अपघात होण्याची शक्यता आहे.

मनसर रोडवर रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे जंक्शनजवळ ट्रक आणि इतर मोठ्या वाहनांचा अपघात झाला आहे. तसेच वाहने आदळून विजेचे खांबही पडले आहेत. हे खांब पुन्हा बसविण्यात आले असून, दिवे पुन्हा सुरू झाले नाहीत.

एवढेच नाही तर विजेचे खांबही निकृष्ट दर्जाचे आहेत. जे लहान वाहनांच्या धडकेने पडतात. त्यामुळे वाहिटोला येथील सर्व्हिस रोड, नाली बांधकाम, वीज व्यवस्थेची कामे त्वरीत पूर्ण करून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: